शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या चाव्या पंचायत समिती प्रशासनाकडे सुपूर्द !

By admin | Updated: November 18, 2016 02:28 IST

ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन; कामकाजात खोळंबा.

वाशिम, दि. १७- विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने गुरुवारी कामकाजाचे संपूर्ण दप्तर पंचायत समितीकडे सोपवून बेमुदत कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जिल्हाभरात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील कामकाज खोळंबले आहे.ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्या निकाली काढण्याची मागणी वारंवार करण्यात आली; मात्र अद्यापही याकडे शासनाने लक्ष दिले नाही. परिणामी, ग्रामसेवक संघटनेने आंदोलनाची रूपरेषा तयार केली असून, त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी जिल्हय़ातील ग्रामसेवकांनी आपल्याकडील दप्तर व ग्रामपंचायतींच्या चाव्या पंचायत समिती प्रशासनाकडे सुपूर्द केल्या. बेमुदत कामबंद आंदोलन पुकारल्याने ग्रामीण भागातील कामकाज ठप्प झाले. कंत्राटी ग्रामसेवकाचा ३ वष्रे सेवाकाळ तत्काळ नियमित करावा, सोलापूर जिल्ह्यातील २३९ ग्रामसेवकांवर केलेली चुकीची कार्यवाही रद्द करावी, ग्रामसेवकांना तीन हजार रुपये प्रवास भत्ता मंजूर करणे, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, सन २0११ च्या लोकसंख्येवर आधारित ग्राम विकास अधिकारी पदे व साजे निर्माण करणे, जादा ग्रामसभा बंद करून १५ ऑगस्ट व २६ जानेवारीची ग्रामसभा त्या दिवशी न ठेवता दुसर्‍या दिवशी ठेवावी व ग्रामसभेची संख्या कमी करावी, ग्रामसेवक संवर्गास वैद्यकीय कॅशलेश सुविधा मिळाव्या, विस्तार अधिकारी यांच्या पदात वाढ करणे, २00५ नंतरचे ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रामसवेक संवर्ग सुधारित जॉब चार्ट लागू करावा, निलंबित ग्रामसेवकांना प्राधान्यक्रमाने कामावर घ्यावे, राज्यभर ग्रामसेवकावर मारहाण, हल्ले, खोट्या केसेस होतात यावर आळा म्हणून सेवा संरक्षण व सरकारी कर्मचारी मारहाण हा गुन्हा अजामीनपात्र करावा, आदी मागण्यांसंदर्भात ग्रामसेवक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व ग्रामसेवक गुरुवारपासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.