शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या लाखो रुपये कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 19:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  :  ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला असून मुख्यालयी न राहता शहरातूनच आपला कारभार करतात. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा लाखो रुपयाचा कर थकीत आहे तसेच अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामसेवकांचे फोन बदं राहत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाच्यावतीने विकास कामासाठी ग्रामपंचायतीला मोठे अधिकार दिले ...

ठळक मुद्देग्रामसेवकांना पडला जबाबदारीचा विसर ‘नॉट रिचेबल’ राहणा-या ग्रामसेवकांमुळे नागरिक त्रस्तसरपंच व सदस्य यांच्या समन्वयातून विकास व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  :  ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला असून मुख्यालयी न राहता शहरातूनच आपला कारभार करतात. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा लाखो रुपयाचा कर थकीत आहे तसेच अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामसेवकांचे फोन बदं राहत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाच्यावतीने विकास कामासाठी ग्रामपंचायतीला मोठे अधिकार दिले आहेत. गावातील मुलभूत विकासासाठी लाखो रुपये निधी येतो. १३ व्या, १४ व्या, वित्त आयोगाची कामे सुध्दा केली जातात. त्याचबरोबर विविध प्रकारची करवसुली सुध्दा ग्रामेवकांना करावी लागते, घरकुल, शौचालय, विहीरीची कामे त्या कामावरील रक्कम मिळण्यासाठी ग्रामसेकांना शोधावे लागते. ग्रामसेवकांनी गावात भेटी देण्यासाठी दिवस ठरविले आहेत. मात्र बहूतांश ग्रामसेवक आपल्या कार्यक्षेत्रात येणाºया गावात जातच नाही.त्यामुळे नागरिकांना त्यांना भेटण्यासाठी पंचायत समिती यावे लागते. येथे आल्यावर त्यांची भेट घेत नाही. फोनवर संपर्क केला असता त्यांचा फोन बंद असतो.त्यामुळे एखादे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागतो. गाव हागणदारी मुक्त करणे, यासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची असते, मात्र अनेक गावात आजही  उघड्यावर शौचास बसणारांची संखया कमी नाही. बहूतांश गावातील करवसुली थकलेली आहे. शासनाने एक दिवस वसुलीचा असा कार्यक्रम राबवून गटविकास अधिकारी व ग्रामसेवक लोकांच्या घरापर्यंत गेले होते. याला प्रतिसाद मिळत लाखो रुपयाची वसुली झाली होती. मात्र हा कार्यक्रम सध्या थंड पडला आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची आहे सरपंच व सदस्य यांच्या समन्वयातून विकास व्हावा अशी अपेक्षा नागरिकात व्यक्त होत आहे. शासनाच्यावतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम युध्द पातळीवर सुरु आहे. गतवर्षी लावलेली झाडे यावर्षीपर्यंत जगलीच नाही, पुन्हा यंदा वृक्षारोपण करण्यात आले. पुढच्या वर्षीही करण्यात येईल् मात्र झाडांची संखया वाढतांना दिसत नाही. याबाबत ग्रामसेवकांनी गंभीर असावे, काही ग्रामपंचायती लोकसंख्या  तेवढी झाडे,  हा उपक्रम राबवित आहेत तर काही ग्रामपंचायती मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यास इच्छुक आहे.  मात्र त्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेणे गरजचे आहे. यासंदर्भात नव्यानेच येथे रुजु झालेले गटविकास अधिकाराी ज्ञानेश्वर ताकरस यांनी लक्ष द्यावे अशी जनतेची अपेक्षा आहे.