शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सभेच्या उपस्थितीसाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या खिशाला झळ

By admin | Updated: May 6, 2017 01:37 IST

गट ग्रामपंचाय सदस्यांना भुर्दंड; मानधनापेक्षा प्रवासाचा खर्च अधिक.

शिरपूर जैन (जि. वाशिम): ग्रामपंचायत सदस्य अतिशय तुटपुंजे मानधनावर कार्य करत असताना, ग्रामपंचायतीच्या सभेसाठी गटग्रामपंचायतमधील सदस्यांना गावातून उपस्थित राहण्यासाठी येणार्‍या प्रवासाचा खर्चच दुप्पट लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत सदस्य सभेसाठी उपस्थित राहण्यास उत्सूक नसल्याचे दिसते. अमरावती विभागात एकूण ३ हजार ९५६ ग्रामपंचायती असून त्यामधील गटग्रामपंचायतीचा आकडादेखील मोठा आहे. अशा गटग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या गावांतील सदस्यांना ग्रामसभा, मासिक सभा, विशेष सभा आदिंसाठी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवासा करता यावे लागते. काही ग्रामपंचायतीमधील दोन गावांचे अंतर ७ किलोमीटरपेक्षाजास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात येण्यासाठी अशा ठिकाणच्या सदस्यांना वाहनाचा आधार घ्यावा लागतो. साधारण १५ रुपये प्रवासभाड्या प्रमाणे सदस्यांना किमान ३0 रुपयांसह इतर खर्च करावा लागतो. त्यांचे मासिक मानधन केवळ २५ रुपये असताना, त्यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी शिलकीचा जो खर्च येतो. तो ग्रामपंचायत सदस्यांना खिशातून करावा लागत असल्याने चित्र आहे. सदस्यांच्या आवश्यक उपस्थितीअभावी अनेकदा ग्रामपंचायतींच्या सभा तहकूबही कराव्या लागतात. त्यामुळे पुन्हा सभेचे आयोजन केल्यानंतर आधी उपस्थित असलेल्या सदस्यांना नाहक भूर्दंंड बसतो. वाशिम जिल्ह्यातील शेलगाव बगाडे या गटग्रामपंचायत अंतर्गत शेलगाव खवणे आणि दापुरी खुर्द ही दोन गावेही येतात. या दोन गावांतील सदस्यांना ग्रामपंचायतीच्या सभेसाठी शेलगाव बगाडे येथे जावे लागते. यातील शेलगाव खवणेच्या सदस्यांना परिसरातील शिरपूर जैनमार्गे शेलगाव बगाडे येथे पोहचावे लागते. यासाठी शिरपूरपर्यंंत १0 रुपये आणि शिरपूर ते शेलगाव बगाडेपर्यंंत १0 रूपये असा २0 रुपये खर्च येतो. अर्थात त्यांना ४0 रुपये खर्च एका सभेचा येतो. ग्रामपंचायत सदस्यांना २0१२-१३ पर्यंंत मासिक मानधन म्हणून केवळ १0 रुपये मिळत असत. शासनाने २0१४-१५मध्ये ग्रामपंचायत सदस्यांचे मानधन अर्थात मासिक मानधन १00 रुपये केले होतो; परंतु गतवर्षीपासून ते कमी करून २५ रुपये करण्यात आले, हे विशेष. आम्हाला शेलगाव खवणे येथून शेलगाव बगाडे येथे सभेसाठी येण्याजाण्याचा खर्च ४0 रुपये येतो, तर मासिक मानधन केवळ २५ रुपये मिळते. यामुळे आम्हाला सभेसाठी उपस्थित राहण्याचा खर्च खिशातून करावा लागतो. शासनाने याचा विचार करून मानधन वाढवायला हवे.-अशोक आनंदा राऊत ग्रामपंचायत सदस्य, शेलगाव बगाडे