शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे धरणे

By admin | Updated: August 2, 2016 01:45 IST

४९१ ग्रामपंचायतींच्या कर्मचा-यांचा समावेश : विविध मागण्यांसाठी आंदोलन.

वाशिम : प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींच्या कर्मचार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे दिले. ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लढा देत आहे. अद्याप अनेक मागण्या प्रलंबित असल्याने याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होत वाशिम जिल्ह्यातही ४९१ ग्राम पंचायतींच्या कर्मचार्‍यांनी धरणे दिले. सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना ग्रॅच्युएटी नियम लागू करण्यात यावा, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सन १ जानेवारी २000 पासून किमान वेतन लागू केले असून, दर ५ वर्षांनी सुधारित किमान वेतनाचे दर लागू करावयास पाहिजे होते. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा वेतनासाठी सुधारित किमान वेतनाची अधिसूचना जाहीर करण्यात यावी, ग्राम पंचायतीच्या सेवाकाळात ग्राम पंचायत कर्मचारी मृत्यू पावल्यास त्यांच्या वारसाला ग्राम पंचायतीचे सेवेत नियुक्ती देण्यात यावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांसाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची ग्राम पंचायत स्तरावर काटेकोर अंमलबजावणी व्हावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांना डॉ.दीपक म्हैसकर यांच्या पेन्शन समिती अहवालानुसार पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या, तसेच ग्राम पंचायत कर्मचार्‍यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात जमा करण्यात यावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांची आकृतीबंध १९८१ च्या लोकसंख्येच्या आधारे २१ जानेवारी २000 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. ग्राम पंचायत कर्मचार्‍यांच्या आकृती बंधात सुधारणा करण्यात यावी, आदी प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी धरणे देण्यात आले.