शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीने तापविले ‘राजकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:07 IST

कारंजा लाड: ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण चांगले तापले असल्याचे दिसून येते. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण चांगले तापले असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर व डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या  कारंजा तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. तालुक्यातील खेर्डा कारंजा, वालई, जांब, गिर्डा या चार ग्रामपंचायतची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग रचनेत फेरबदल करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सुरू असल्याने त्या ग्राम पंचायतीच्या प्रभागरचनेसंदर्भात आक्ष्ेाप दाखल झाल्याने या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीची नवीन तारीख निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात येईल, असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले. या वर्षी पहिल्यादांच सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने ही निवडणूक नेमकी कशी राहील, या बाबत जनमानसात संभ्रम दिसून येत आहे. यापूर्वी नगर परिषदेसाठी याच नियमावर आधारित नगराध्यपदाची निवड थेट जनतेतून घेण्यात आली. त्यावेळी पूर्वी काढलेले आरक्षण रद्द करून व संभाव्य सदस्यांच्या संख्येत एकाची वाढ करून नगराध्यक्ष पदाची निवडणुक थेट उमेदवारांनी लढविली. त्याच पृष्ठभूमीवर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लढविली जाईल की त्यात काही फेरबदल होईल, या बाबत मतदार संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येते. ७ ऑक्टोबरला मतदान होत असून, त्याकरिता १५ ते २२ सष्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.  ९ ऑक्टोबर रेाजी मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येईल. निवडणूक असलेल्या गावागावात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, गाव पुढारी मोर्चेबांधणीच्या कामाला आहे. यावर्षी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी खर्चाची र्मयादा निश्‍चित केली असून, त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही निश्‍चित केल्याने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत येईल, अशी चिन्हे आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूक पुढार्‍यांच्या तोंडपाठ असली तरी सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने मतदारासोबत पुढार्‍यातही याबाबत संभ्रम अवस्था दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.  याबाबत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदस्य संख्या कायम राहून सरपंच पदासाठी स्वतंत्र उमेदवार निवडणूक लढवेल. तर यापूर्वी सरपंच पदासाठी काढलेले आरक्षणच कायम राहील, अशी माहिती तहसिलदारांनी दिली.