शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

Gram Panchayat Election : निवडणूक प्रचारासाठी उरले अवघे चार दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 11:34 IST

Gram Panchayat Election: प्रचारासाठी उमेदवारांकडे अवघे चार दिवस उरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या  १६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा ज्वर चांगलाच चढला असून, ३ हजार २२६ उमेदवार सध्या प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रचारासाठी उमेदवारांकडे अवघे चार दिवस उरले आहेत.१३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे उपलब्ध वेळेचा उमेदवार पुरेपूर वापर करून प्रचारावर भर देत आहे. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात १४८७  उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. परिणामी प्रत्यक्षात आता १४८७  जागांसाठी तीन हजार २२६ उमेदवार निवडणूक रिंगणात भाग्य आजमावत आहे. काही ठिकाणी माेठ्या प्रमाणात युवक रिंगणात उतरलेले दिसून येत आहे. शेलूबाजार येथे गत निवडणुकीतील एकही सदस्य यंदाच्या निवडणुकीत उतरलेला दिसून येत नाही. १५ जानेवारी रोजी मतदान  होत आहे. प्रचार संपण्यास चार दिवस बाकी असल्याने प्रशासकीय पातळीवर  मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी निवडणूक विभाग करत असून,  कर्मचाऱ्यांचेही प्रशिक्षणही घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.

निवडणूक हाेणाऱ्या ग्रामपंचायतीजिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायती अविराेध         झाल्या आहेत. त्यामुळे १५२ ग्रामपंचायतीमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १९, रिसाेड तालुक्यातील ३२, मालेगाव तालुक्यातील २८, मंगरूळपीर तालुक्यातील २५, कारंजा तालुक्यातील २७ व मानाेरा तालुकयातील २१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येथील उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. यात ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्या. यामध्ये वाशिम तालुक्यातील ५,  रिसाेड तालुक्यातील २,  मालेगाव तालुक्यातील २, कारंजा तालुक्यातील १ व मानाेरा तालुक्यातील १ ग्रामपंचायतचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील  तोंडगाव, कोंडाळा झामरे, सावरगाव जिरे, भोयता, किनखेडा या सर्वाधिक ग्रा.पं. आहेत.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक