वाशिम : वाशिम तालुक्यातील एका ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि तीन ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक मतदानाचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. सुराळा ग्रामपंचायतच्या वार्ड दोनच्या पोटनिवडणुकीत सुनिता गजानन चौधरी आणि अनिता अरुण चौधरी यांना समसमान म्हणजे ९८ मते मिळाली. यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये सुनिता चौधरी विजयी झाल्या असून, ईश्वरचिठ्ठीने अनिता चौधरी यांना पराभूत केले. खंडाळा खुर्द ग्रामपंचायतच्या वार्ड दोनमधून उल्हास माधव सावके विजयी झाले. कोकलगाव वार्ड दोनमधून रेखा विठोबा काळबांडे अविरोध झाल्या. तहसीलदार राहुल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक दंदे, सहाय्यक म्हणून आर.जे. ठाकूर यांनी कामकाज पाहिले.
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर
By admin | Updated: November 4, 2015 03:01 IST