शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जमिनींमधील घोळ येणार संपुष्टात!

By admin | Updated: July 17, 2017 02:49 IST

‘वाशिम लॅन्ड बँक सिस्टीम’ कार्यान्वित : आरक्षित व खुल्या जमिनींची माहिती उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आदिवासी जमीन, भूदान जमिनींची कुणालाही विक्री करता येत नाही; मात्र जिल्ह्यात असे प्रकार घडले आहेत. हा घोळ ‘लॅन्ड बँक सिस्टीम’मुळे संपुष्टात येणार आहे. याशिवाय या प्रणालीमुळे खुल्या जमिनींचे गणित जुुळविणेही शक्य झाले आहे.‘लॅन्ड बँक सिस्टीम’मध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय जमिनी, भोगवटदार वर्ग-२ जमिनी, आदिवासी जमिनी, भूदान जमिनी, नझूल जमिनी व सिटी सर्व्हे याविषयी सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक घटकातील जमिनीच्या माहितीची सांगड ‘गूगल मॅप’शी घालण्यात आली असून, त्या जमिनीचा नकाशा पाहण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जमिनीवर असलेली प्रादेशिक योजना, विकास योजना आदी माहितीही या ‘लॅन्ड बँक सिस्टीम’द्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित जमीन कोणत्या कारणांसाठी आरक्षित आहे, ती जमीन कुणाला देण्यात आली, उर्वरित किती जमीन शिल्लक आहे, याचा सविस्तर तपशील केवळ एका ‘क्लिक’वर पाहता येणे यामुळे शक्य झाले आहे. या प्रणालीमुळे महसूल विभागात पारदर्शकता येणार असून, विविध शासकीय कामांना गती मिळणार आहे. दरम्यान, वाशिम जिल्हा प्रशासनाने तयार केलेली ही अद्ययावत प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्याच्या दिशेने हालचाल सुरू झालेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आदिवासी, भूदान जमिनींचा लागणार मेळ!महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६ व ३६ ‘अ’ नुसार आदिवासींची जमीन बिगर आदिवासीला खरेदी करायची झाल्यास महसूल व वन विभागामार्फत परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच आदिवासींची जमीन दुसऱ्या आदिवासीला विक्री करायची झाल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. भूदान स्वरूपातील जमिनींबाबतही थोड्याफार फरकाने हाच नियम लागू होतो. असे असताना पुरेशा माहितीअभावी अथवा बळजबरीने अशा प्रकारातील जमिनींची खरेदी-विक्री झालेली आहे. ‘लॅन्ड बँक सिस्टीम’लीमुळे अशा जमिनींचा मेळ लागणे शक्य होणार आहे. यासह जिल्ह्यात शासकीय मालकीची किती जमीन आरक्षित आणि किती शिल्लक आहे, हे कळणेही सोपे होणार आहे. राज्यभरात अशी प्रणाली कार्यान्वित करणारे वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय हे एकमेव ठरल्याचा दावा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केला आहे.