शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराच्या अनामत रकमेबाबत शासन कठोर

By admin | Updated: November 7, 2014 23:31 IST

आर्थिक नुकसानाला अभियंते राहतील जबाबदार; जलसंपदा विभागाचा निर्णय.

अकोला: कंत्राटदाराची सुरक्षा अनामत रक्कम (बॅँक गॅरंटी) संदर्भात आर्थिक नुकसान झाल्यास, संबंधित अभियंत्यांना जबाबदार धरण्याचा निर्णय राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतला आहे. कंत्राटदाराच्या बॅँक गॅरंटीची पडताळणी, मुदतवाढ अथवा रोखीकरण या बाबी वेळेवर होत नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आता जलसंपदा विभागाने सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जलसंपदा विभागांतर्गत कंत्राटदारामार्फत विकास कामे करण्यात येतात. कामाची निविदा मंजूर करताना, संबंधित कंत्राटदाराला बॅँक गॅरंटीची पूर्तता करण्यास कळविण्यात येते. अनामत रक्कम कोणत्या स्वरूपात भरता येईल, हेदेखील कंत्राटदारला कळविण्यात येते. बॅँक गॅरंटीबाबत केंद्रीय दक्षता आयोगाने वेळोवेळी स्पष्ट सूचनाही दिल्या आहेत; मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आता बॅँक गॅरंटीची कार्यवाही वेळेत व्हावी, बॅँक गॅरंटीच्या बनावट प्रकरणांना आळा बसावा, यासाठी जलसंपदा विभागाने ३ नोव्हेंबर रोजी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वे..- बॅँकेद्वारे कंत्राटदाराच्या बॅँक गॅरंटीची मूळ प्रत थेट संबंधित विभागाला रजिस्टर पोस्टाद्वारे पाठविण्यात यावी. - अपवादात्मक परिस्थितीत बॅँक गॅरंटीची दुय्यम प्रत संबंधित विभागाला पाठविण्याची विनंती कंत्राटदाराने बॅँकेला करावी. - बॅँक गॅरंटीची पडताळणी झाल्याशिवाय कार्यारंभ आदेश देण्यात येऊ नये. - प्रकल्प, कामाला मुदतवाढ मिळाल्यास, बॅँक गॅरंटीची वैधता त्यानुसार वाढविण्यात यावी. - बॅँक गॅरंटीचे रोखीकरण वैधता कालावधीतच करण्यात यावे. *बनावट बॅँक गॅरंटीची जबाबदारी होईल निश्‍चितप्रत्येक विभागामध्ये बॅँक गॅरंटीपोटी प्राप्त होणार्‍या अनामत रकमेबाबत अद्ययावत नोंदवही ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागाने जारी केले आहेत. बॅँक गॅरंटीची पडताळणी, मुदतवाढ व रोखीकरण प्रक्रिया वेळेवर पार न पडल्याने होणार्‍या आर्थिक नुकसानीला संबंधित कार्यकारी अभियंता, विभागीय लेखा अधिकारी किंवा लेखापाल, कंत्राटाशी संबंधित विभागातील लेखा तपासणारे लिपिक व निविदा लिपिक यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.