केंद्र सरकारने तीन कृषी कायदे अंमलात आणले आहेत. हे तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन पुकारले आहे. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण भारतात गोरसेनेने ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्या अनुषंगाने १८ जानेवारी रोजी गोरसेनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात व गोरसेना जिल्हा उपाध्यक्ष आशिष राठोड यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० जानेवारीपासून महिला व पुरुषांच्या सहभागातून सुरू झालेल्या साखळी उपोषणात गोरसेना जिल्हा उपाध्यक्ष आशिष राठोड, मानोरा तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड, वाशिम तालुकाध्यक्ष उल्हास राठोड, गोपाल चव्हाण यांच्यासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ वाशिम येथे गोरसेनेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:36 IST