शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या निलगायीच्या पिलाला दिले जीवनदान

By admin | Updated: October 9, 2016 01:43 IST

सर्वधर्म आपतकालीन पथकाचे कार्य; उंबर्डा येथील घटना.

उंबर्डाबाजार(जि. वाशिम),दि. 0८- शेतात असलेल्या भुईंसपाट विहीरीत पडलेल्या निलगायीच्या पाडसाला तीन तासाच्या अथक परिश्रमाने सर्वधर्म आपातकालीन पथकाच्या उंबर्डाबाजार येथील युवकांनी विहीरी बाहेर काढुन जीवनदान दिल्याची घटना घडली.ग्राम उंबर्डाबाजार येथील शेतकरी सागर चिरडे यांचे दुघोरा शेत शिवारात उंबर्डाबाजार ,दुघोरा रस्त्यालगत शेती असून विहीरीचे बांधकाम करण्यात आले नसल्याने विहीरीजवळ येईपर्यंंत विहीर दिसत नाही. अशातच ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास शेतातून जाणार्‍या निलगायीच्या कळपातील एक पाडस अचानक विहीरीत पडले.सदरची घटना सागर यांचे काका यांनी पाहिली व याची माहिती तातडीने उंबर्डाबाजार येथील काळेकर यांना देताच सदरची माहिती त्यांनी आपातकालीन पथकाचे उंबर्डाबाजार येथील गणेश हळदे व वनविभागाला दिली. क्षणाचाही विलंब न करता आपतकालीन पथकाचे गणेश हळदे, महेश दिघडे, रोहन देंडव तुषार चिरडे, काळेकर यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी निलगायीचे पाडस विहीरीच्या पाण्यात पोहून थकुन अखेरचे क्षण मोजत असल्याचे पाहून गणेश हळदे व रोहन देंडव यांनी विहीरीत उडी मारुन निलगायीचरूत्त पाडसाला आधार दिला. निलगायीच्या पाडसाला विहीरी बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी काहीच साहित्य उपलब्ध नसल्याने पथकातील युवकांनी रबरी पार्इृपचा वापर करुन निलगायीच्या पाडसाला विहीर बाहेर काढुन शेतात सोडून दिले. निलगायीच्या पाडसाला जीवनदान देणार्‍या आपातकालीन पथकातील कार्यकत्यांचे स्वागत होत असतांना वनविभागाच्या कारभाराबाबत मात्र अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.