मंगरुळपीर : वाशिम मंगरूळपीर मतदार संघात असंख्य लघुव्यावसायीक व्यवसाय करूण कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात अशा सर्व लघुव्यावसायीकांस व्यवसाय करण्याकरिता शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हासचिव संतोष गव्हाळे यांनी वरिष्ठ पातळीवर केली आहेवाशीम मंगरूळपीर मतदार संघात मोठय़ा प्रमाणावर बेरोजगार असुन बेरोजगारांना रोजगारासाठी मोठय़ा शहराकडे धाव घ्यावी लागते.तर यापैकी अनेकांना शहरामध्ये रोजगार उपलब्ध होईल याची श्वाशती नसते असे असंख्य बेरोजगार तालुक्याच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला आपली दुकाने थाटुन आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवितात अशातच अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीममुळे व्यवसाय बंद करावा लागतो.परिणामी त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ येत हीच बाब लक्षात घेवुन शासनाने सर्व लघुव्यावसायीक अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास बेरोजगाच्या व्यावसायीकाचा प्रश्न्न सुटण्यास हातभार लागेल या बाबत संतोष गव्हाळे यांना अत्यंत तळमळ असल्यामुळे त्यांनी हा मुद्दा वरिष्ठ पातळीवर मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
लघुव्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा द्या
By admin | Updated: August 19, 2014 00:13 IST