शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

शेतक-यांच्या पिकाला भाव द्या - प्रतापराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 19:35 IST

मेहकर : गेल्या दोन तीन वर्षापासून मेहकर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. तर सध्या शेतकºयांच्या पिकांना भाव नाही, कवडीमोल भावाने पिके विकावी लागत आहे.

ठळक मुद्देशेतक-यांची पिळवणूक करणा-यांवर गुन्हे दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : गेल्या दोन तीन वर्षापासून मेहकर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. तर सध्या शेतक-यांच्या पिकांना भाव नाही, कवडीमोल भावाने पिके विकावी लागत आहे. तर शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये सरकारने शेतक-यांच्या पिकांना भाव द्यावा, तसेच शेतक-यांची पिळवणूक करणा-या व्यापा-यांवर गुन्हे दाखल करावे, अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खा.प्रतापराव जाधव व शिवसेना पदाधिका-यांनी २३ आॅक्टोबर रोजी दिला आहे.शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी खा.प्रतापराव जाधव यांचे नेतृत्वात २३ आॅक्टोबर रोजी जनसंपर्क कार्यालयापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतक-यांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार व तहसिलदार संतोष काकडे यांना देण्यात आले. सध्याच्या स्थितीत शेतकºयांनी आपली पिके घरी आणली आहे. ऐन हंगामात पावसाची कमतरता तर सुगीच्या दिवसात झालेली अतिवृष्टी, यामुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. तर व्यापा-यांकडून शेतक-यांची पिळवणूक होत आहे. शेतकरी हवालदिल झालेला असताना शेतमालाला मुळीच भाव नाही. बाजारामध्ये कापूस ३ हजार रुपये, सोयाबीन अठराशे ते चोवीसशे रुपये भावाने घेतल्या जात आहे. उडीद, मूग या पिकांना भाव नाही. मागील हंगामात नाफेडमार्फत तुरीची खरेदी केली होती. त्या तुरीचे चुकारे सुद्धा अद्याप मिळाले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जाहीर केले होते. मात्र अद्यापपर्यंत एकाही व्यापा-यावर गुन्हा दाखल झालेला नाही. मागीलवर्षी शासनाने सोयाबीनला २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले होते. ते अनुदानही मिळाले नाही तर पणन महामंडळ तसेच सरकारी संस्थाद्वारे हमी भावाने शेतकºयांचे कापुस, सोयाबीन, उडीद, मूग हा शेतमाल खरेदी करण्यात यावा. अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनामध्ये खा.प्रतापराव जाधव, कृउबास सभापती माधवराव जाधव, न.पा.गटनेते संजय जाधव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, जि.प.सदस्य आशिष रहाटे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपतालुका प्रमुख समाधान साबळे, दत्तात्रय पाटील शेळके, संजय धांडे, सुरेशराव काळे, विश्वासराव सवडदकर, जयचंद बाठीया, रामेश्वर भिसे, पिन्टु सुर्जन, मनोज जाधव, माधव तायडे, समाधान सास्ते, अक्काबाई गायकवाड, पि.आर.देशमुख, वामनराव दळवी, विकास जोशी, पं.स.उपसभापती राजु घनवट, श्याम इंगळे, रतन मानघाले, अशोक पसरटे, प्रमोद काळे, भुजंगराव म्हस्के, तौफीक कुरेशी, किशोर चांदणे, मदन होणे, अशोक धोटे, सुशांत निकम, संदीप गायकवाड, सुपाजी पायघन, सचिन तांगडे, केशवराव खुरद, अनिल सावंत, परमेश्वर डगडाळे, प्रकाश राठोड, शरद मानघाले, आकाश ढोरे, संजय खंडागळे, पिन्टु भुजवटराव, पप्पु जवंजाळ, श्याम जोशी, रामा जुमडे, सुमित शिन्दे, नंदु बंगाळे, शंकर भुसारी, गजानन खरात, संपतराव टेकाळे, विलास मोहरुत यांचेसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Prataprao Jadhavप्रतावराव जाधव