लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : सुकांडा येथे शेतीच्या वादावरून मुलीला कुर्हाड मारून जखमी केल्याची घटना १८ जूनच्या रात्रीदरम्यान घडली.याबाबत सत्यभामा घुगे यांनी मालेगाव पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले, की ज्ञानेश्वर आंधळे यांच्यासह १४ जणांनी घरी येऊन शेत का पेरले, असे म्हणत माझ्या मुलीच्या डोक्यावर कुर्हाडीने वार करून जखमी केले. शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून पोलिसांनी १४ जणांवर गुन्ह्याची नोंद केली आहे.
कु-हाड मारून मुलीस केले जखमी
By admin | Updated: June 20, 2017 04:26 IST