वाशिम : राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करता यावा यासाठी ई-पास सेवा सुरू केली आहे. सर्वसामान्यांना ई-पास अगदी सहज उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारने युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास सिस्टिम विकसित केली असून, घरबसल्या युनिव्हर्सल ई-पास मिळविता येणार आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी हा ई-पास मिळणार आहे. ही वेबलिंक सर्वच ब्राउझर्सवर उघडू शकणार आहे. नागरिकांनी या बेवलिंकवरून ई-पास डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची आहे.
०००००००००
कोट
लसीचे दोन डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांना रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी हा ई-पास मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाने युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास सिस्टिम विकसित केली आहे. घरबसल्या युनिव्हर्सल ई-पास मिळविता येणार आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
०००००००००००००
दोन्ही डोस घेतलेले किती?
फ्रंटलाईन वर्कर्स ९७६२
आरोग्य कर्मचारी ६२००
१८ ते ४४ वयोगट ९७४२
४५ ते ६० ४१०७८
६१ पेक्षा जास्त वयाचे ४८७६३
०००००००००००
दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण (टक्क्यांत) १३