शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीरच्या मनोरंजनाचे वैभव इतिहास जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

मंगरुळपीर : तालुक्यातील जवळपास तीन पिढ्यांचे मनोरंजन व समाज प्रबोधनातही महत्त्वाची भूमिका वठविणारी मंगरुळपीर शहरातील शशीमोहन सिनेमा टॉकीज आता ...

मंगरुळपीर : तालुक्यातील जवळपास तीन पिढ्यांचे मनोरंजन व समाज प्रबोधनातही महत्त्वाची भूमिका वठविणारी मंगरुळपीर शहरातील शशीमोहन सिनेमा टॉकीज आता इतिहास जमा झाली आहे. चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांनी पाठ केल्याने दोन वर्षांपासून ही टॉकीज बंद पडली. यातून पुढे उत्पादन होण्याची अपेक्षाच नसल्याने चित्रपटगृहाच्या मालकांनी इमारतीसह जागेची विक्री केली असून, व्यापारी संकुल निर्मितीसाठी या टॉकीजची इमारत पाडली जात आहे.

मंगरुळपीर शहरात १९५९ मध्ये राठी परिवाराने शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य मार्गावर शशीमोहन टॉकीज या नावाने चित्रपटगृहाला सुरुवात केली होती. गत २० वर्षांचा काळ वगळला, तर या चित्रपटगृहाने जवळपास तीन पिढ्यांचे मनोरंजन व त्याच माध्यमातून समाज प्रबोधनही केले. या सिनेमा टॉकीजचे वैभव जिल्हाभरात पसरले होते. तालुक्यासह जिल्हाभरातील हजारो चित्रपटप्रेमींची येथे चित्रपट पाहण्यासाठी अनेकदा गर्दी उसळत असल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प व्हायची; परंतु याची साधी तक्रारसुद्धा कोण्या नागरिकाने कधी केली नाही. या चित्रपटगृहाने १०५९ ते २०१० पर्यंतच्या पाच दशकांतील हजारो नावाजलेल्या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना दिला; परंतु गत २००१ पासून चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी पाठ करण्यास सुरुवात केली. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर नवनवे चित्रपट पाहायला मिळू लागले. शिवाय मालिकांनीही चित्रपटगृहाचा प्रेक्षक हिरावून घेतला. परिणामी, चित्रपटगृह चालविणे कठीण झाले. त्यामुळेच मनोरंजनाचे वैभव असलेली मंगरुळपीर येथील शशीमोहन टॉकीजही बंद पडली आणि आता येथे व्यापारी संकुलाच्या निर्मितीची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.

---------

दूरचित्रवाणी वाहिन्यांसह कोरोनाचा परिणाम

गेल्या २० वर्षांत विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांचे वाढलेल्या प्रस्थामुळे प्रेक्षकांनी आधीच चित्रपटगृहांकडे पाठ केली होती. त्यात गत दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे चित्रपटगृहेच बंद असून, अद्यापही चित्रगृहांना परवानगी शासनाने दिलेली नाही. त्यामुळे मंगरुळपीर येथील चित्रपटगृह चालविणेच काय, तर सांभाळणेही मालकांना कठीण झाले होते.

---------------

दहा वर्षांत मोठे आर्थिक नुकसान

गत २० वर्षांपासून पायरसीमुळे नवे चित्रपट घरी पाहण्यास मिळत असताना दूरचित्र वाणी मालिकांचेही प्रस्थ वाढल्याने चित्रपटगृहाकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले होते. अशा कठीण काळातही मंगरुळपीर येथील चित्रपटगृह चालविण्याचे कार्य मालकांनी केले. त्यामुळे १० वर्षांत शशीमोहन टॉकीजच्या मालकांना मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागले.