मालेगाव (जि. वाशिम) : शहरात सोमवारी गणेश विसर्जन होणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी २८ सप्टेंबर रोजी मालेगावमधे गणेश विसर्जन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार सोमवारी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. मिरवणूक मार्गावर कडक बंदोबस्त लावण्यात येणार आहे. मिरवणूक गांधी चौक येथून दुर्गा चौक, जैन मंदिर समोरून माळी वेटाळ, खवले वेटाळ, पाण्डे वेटाळ मार्गे मशिदीसमोरून शिव चौक, मेडिकल चौक मार्गे जाणार आहे. मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी सीसी कॅमेरे लावले आहेत. गत रामनवमीच्या दिवशी काही समाजकंटकांनी दगडफेक केली होती. यावेळी असा अनुचित प्रकार घडू नये, याकरिता प्रशासनाकडून ही व्यवस्था करण्यात आली आहे. दोन उपविभागीय अधिकारी, तीन पोलिस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक, १२0 पोलीस कर्मचारी, १५ महिला पोलीस कर्मचारी, पाच होमगार्ड, चार आरएएफ जवान असे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मालेगावात आज गणेश विसर्जन
By admin | Updated: September 28, 2015 02:17 IST