शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मानोर्‍यात ‘गड आला, पण सिंह गेला’चे चित्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:04 IST

मानोरा: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक गटांचे सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाल्याने ‘गड आला, पण सिंह गेला’चे चित्र दिसून आले.

ठळक मुद्देप्रस्थापित गटांना हादरेराजकीय नेत्यांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक गटांचे सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाल्याने ‘गड आला, पण सिंह गेला’चे चित्र दिसून आले.  तालुक्यात अनेक प्रस्थापितांची पत मात्र उघड झाली. तालुक्यात सर्वाधिक ग्रा.पं.च्या निवडणुका या टप्प्यात असल्याने आणि भविष्यातील निवडणुका लक्षात घेता याला महत्त्व प्राप्त झाले. जसजसे निकाल लागले तसे गुलालाचा  उधळण होत गेली. संपूर्ण शहरातील रस्ते गुलालमय झाली. तालुक्यात पहिला निकाल ग्रा.पं. पोहरादेवीचा आला.  यात माजी आ. अनंतकुमार पाटील गटाचा  सरपंच पदाचा उमेदवाराचा पराभव होऊन प्रथमच विरोधी गटाचा सरपंच जनतेतून निवडून आला. निवडून आलेला सरपंच पोहरादेवी तीर्थ विकास  पॅनलचे असल्याचे जितेंद्र महाराज, कबीरदास महाराज, रमेश महाराज मोन्टी राठोड,  नवनिर्वाचित सरपंच लक्ष्मीबाई खंडारे, यांनी सांगितले. येथे ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली. माहुली ग्रा.पं.मध्ये कृउबासचे  संचालक राम राठोड सरपंचपदी प्रचंड मतांनी विजयी झाले. त्यांनी आपली सत्ता कायम ठेवली. सोयजना ग्रा.पं.मध्ये गणेश मिसाळ गटाचा सफाया झाला असून, विनोद चव्हाण यांचा ३ मतांनी निसटता विजय झाला, धानोरा ग्रा.पं.मध्ये माजी सभापती नीळकंठ घाटगे गटाचा सफाया झाला. येथे केशवराव नाईक आणि शेषराव नाईक या दोन भावाची  प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात शेषराव नाईक यांच्या सुनेचा  पराभव झाला, तर केशवराव नाईक गटाचा  विजय झाला. रोहणा ग्रामपंचायतमध्ये नरेंद्र राऊत  गटाचा पराभव झाला असून, येथे पवार गटाचा झेंडा फडकला. यात काशीराम राठोड यांनाही आपली पत राखता आली नाही. जनुना खुर्द ग्रा.पं.मध्ये बँकेचे संचालक उमेश ठाकरे गटाने झेंडा फडकविला. आसोला  ग्रा.पं. मध्ये जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष  प्रकाश राठोड गटाचा सुपडा साफ झाला.  आमदरी ग्रा.पं.मध्ये दोन दिग्गज भावात भाजपाचे ठाकूरसिंग चव्हाण  यांच्या गटाची सरशी झाली. येथे बाजार समितीचे उपसभापती गोविंद चव्हाण, चिंतामन चव्हाण यांची सून पराभूत झाली. एकलारा ग्रा.पं.मध्ये  भाजपाचे  उपतालुका प्रमुख दिलीप चव्हाण यांच्या गटाला सत्ता कायम राखता आली नाही, हे विशेष. -