शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस’ व्यवहारांचा निर्धार ठरला ‘फुसका बार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५०० आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यासोबतच ‘कॅशलेस’ व्यवहारांचा निर्धारही करण्यात आला होता; परंतू प्रभावी जनजागृती अभाव आणि पुरेशा प्रमाणात ‘पॉस’ यंत्रांचा पुरवठा झाला नसल्याने हा निर्धार निव्वळ ‘फुसका बार’ ठरल्याचे दिसून येत आहे.नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी ...

ठळक मुद्दे प्रशासनानेही टेकले हात ‘पॉस’ यंत्रांचा तुटवडा कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५०० आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यासोबतच ‘कॅशलेस’ व्यवहारांचा निर्धारही करण्यात आला होता; परंतू प्रभावी जनजागृती अभाव आणि पुरेशा प्रमाणात ‘पॉस’ यंत्रांचा पुरवठा झाला नसल्याने हा निर्धार निव्वळ ‘फुसका बार’ ठरल्याचे दिसून येत आहे.नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासोबतच बाजारपेठेत ‘कॅशलेस’ व्यवहाराला चालना मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबर २०१६ पासून फेब्रूवारी २०१७ पर्यंत तीन महिने यासंबंधी युद्धस्तरावर जनजागृती केली. जिल्ह्यातील कारंजा आणि वाशिम या दोन मोठ्या शहरांमधील बाजारपेठेत ‘कॅशलेस झोन’ उभारण्याचा निर्णय देखील याचदरम्यान घेण्यात आला. मात्र, त्यासाठी लागणाºया ‘पॉस मशीन’ बँकांकडून उपलब्ध करून देण्याकामी प्रचंड दिरंगाई बाळगल्या गेल्याने ‘कॅशलेस’चा गाजावाजा पूर्णत: निरर्थक ठरला आहे.तथापि, रोखीने होणाºया व्यवहारांवर आळा घालून संपूर्ण जिल्हा ‘कॅशलेस’ करायचा असेल तर सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये प्रती तालुका किमान २ हजार, यानुसार १२ हजार ‘पॉस मशीन’ उपलब्ध होऊन त्या कार्यान्वित होणे गरजेचे आहे. असे असताना आजपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ५०० ‘मशीन’ही कार्यान्वित झाल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे व्यापाºयांमधून ‘कॅशलेस’ व्यवहारांसंबंधी दृढ इच्छाशक्ती असतानाही त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अशक्य ठरले आहे. येत्या काही दिवसांत या संदर्भात पुन्हा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून कॅशलेस व्यवहारांची अंमलबजावणी करण्यास व्यावसायिकांना प्रेरित केले जाणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.