शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकासासाठी निधीचा उपयोग व्हावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:43 IST

८ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे वाशिम जिल्हा वार्षिक योजना सन २०२१ - २२च्या प्रारूप ...

८ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे वाशिम जिल्हा वार्षिक योजना सन २०२१ - २२च्या प्रारूप आराखडा बैठकीत पवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले की, जिल्ह्यातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ५ कोटी ४४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून वाशिम येथे बांधण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्राची इमारत ही ग्रीन बिल्डिंग असावी. जिल्हा वार्षिक योजनेत यंत्रणांना निधी देताना जिल्हाधिकारी यांनी आता आय - पास प्रणालीकडे लक्ष द्यावे. या प्रणालीअंतर्गत अमरावती विभागात उत्तम कार्य करणाऱ्या एका जिल्ह्याला ५० कोटी रुपयांचा आव्हान निधी देण्यात येणार आहे. हा निधी वाशिम जिल्ह्याला मिळाला पाहिजे, यासाठी प्रशासनाने काम करावे, असे पवार म्हणाले. वाशिम जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात असल्याचे सांगून पवार म्हणाले, आकांक्षित जिल्ह्याचे सूत्र ठरवून जी रक्कम येते, त्यामध्ये वाढ करून जिल्हा वार्षिक योजना निधीचा समावेश करून जिल्ह्याचा सन २०२१ - २२चा आराखडा १८५ कोटीचा निश्चित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी जलजीवन मिशनचा निधी वळती करून द्यावा किंवा अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत निधीची तरतूद करण्यात यावी. आमदार अ‍ॅड. सरनाईक म्हणाले, वाशिम येथील स्मशानभूमीत विद्युत दाहिनीसाठी नगरपरिषदेने निधीची मागणी केली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, असे ते म्हणाले. आमदार झनक म्हणाले, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पावर जाणाऱ्या पोचमार्गांची दुरवस्था झाली आहे. त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करावी.

जिल्हा प्रारूप आराखडा सन २०२१ - २२चे सादरीकरण आणि सन २०२० - २१ या वर्षात झालेल्या खर्चाची माहिती जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिली. या सभेला उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.