शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

८५ ग्रामपंचायत भवनसाठी निधी मिळाला; बांधकाम केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST

संतोष वानखडे वाशिम : जिल्ह्यातील १०२ पैकी ८५ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारतींसाठी (ग्रामपंचायत भवन) शासनाकडून निधी मिळून सहा महिन्यांचा कालावधी ...

संतोष वानखडे

वाशिम : जिल्ह्यातील १०२ पैकी ८५ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारतींसाठी (ग्रामपंचायत भवन) शासनाकडून निधी मिळून सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप बांधकामाला सुरुवात नाही. स्वतंत्र इमारतीअभावी या ग्रामपंचायतींचा कारभार भाडेतत्त्वावरील इमारतीतून सुरू असून पावसाळ्याच्या दिवसात ‘दप्तर’ सांभाळताना ग्रामसेवकांची कसरत होत आहे.

जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, १०२ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत नाही. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर अन्य कर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वसूल केले जातात. स्वतंत्र इमारती नसल्याने या ग्रामपंचायतीचा कारभार भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जतन करताना ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची गैरसोय होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही ठिकाणी इमारतीत पाणी गळती होत असल्याने महत्त्वाचे दस्तऐवज भिजण्याची भीतीही कर्मचाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारती नसल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. स्वतंत्र इमारत व परिसरात नसल्याने मासिक सभा, ग्रामसभा नेमक्या कुठे घ्याव्यात, असाही पेच निर्माण होतो. जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारतीसाठी निधी मिळावा, याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. डिसेंबर २०२० मध्ये ८५ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाला शासनाकडून मंजुरी मिळाली तर फेब्रुवारी २०२१ दरम्यान निधी मिळाला. परंतु, अद्याप बांधकामाला सुरुवात होऊ शकली नाही. लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, असे सांंगण्यात येत आहे.

००००००००००००००००

नागरतास येथे कार्यालय नाही

मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील ग्रामपंचायतीला कार्यालयच नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार कसा चालवावा, असा पेच निर्माण होतो. स्वतंत्र कार्यालय केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा कायम आहे.

००००००००००००००००

कोट

८५ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामांना मंजुरी व निधी मिळालेला आहे. तालुकास्तरीय यंत्रणेकडे निधी सुपूर्ददेखील करण्यात आला. लवकरच बांधकामाला सुरुवातदेखील होईल.

- विवेक बोंद्रे

प्रभारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

जिल्हा परिषद वाशिम

.......

कोट बॉक्स

प्रत्येक ग्रामपंचायतीला हक्काचे स्वतंत्र कार्यालय असावे, अशी संघटनेची मागणी आहे. स्वतंत्र कार्यालय असेल तर मासिक सभा घेणे सुलभ होते, तसेच महत्त्वाचे दस्तऐवज ठेवण्याची व्यवस्थाही होते.

- अरुण इंगळे

जिल्हा सचिव,

ग्रामसेवक संघटना, वाशिम