शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहिन गायरान धारकांचा मोर्चा

By admin | Updated: June 20, 2014 00:13 IST

विविध मागण्यासाठी भूमिहीन गायरानधारकांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

मंगरूळपीर : विविध मागण्यासाठी भूमिहीन गायरानधारकांनी १९ जून रोजी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मानवी हक्क अभियान संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात ग्रामीण भागातून मोठय़ा संख्येने भूमिहीन गायरानधारक सहभागी झाले होते. यावेळी दादासाहेब क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात भूमिहीन गायरान धारकाच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, गायरान धारकांच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या आहेत. यामध्ये विशेषत: वनजमिनी व गायरान त्वरित कास्तकाराच्या नावाने कराव्या, संविधानिक घटनेची अंमलबजावणी न करणारे प्रशासनावर जातीय प्रतिबंधक कारवाई करून गुन्हा दाखल करावा, बेघर कुटुंबाना शासकीय जागा उपलब्ध करून घरकुल बांधून देण्यात यावे. तसेच गायरान व वनजमिनीची ताब्यात असलेल्या जमिनीची मशागत करण्यासाठी विरोध करणार्‍यावर कडक कारवाई करून तसेच पेरलेले पिकाचे संरक्षण करून पेरलेली पीक उद्धवस्त करणार्‍याविरूद्ध राष्ट्रीय द्रोहाचेगुन्हे दाखल करावे. याशिवाय राज्यातील स्त्रियावर रोजच अन्याय, अत्याचार व बलात्कार होत असून स्त्रियांना स्वत:च्या संरक्षणासाठी विनाअट बंदुकाचे परवाने द्यावे, श्रीमंतांचे बीपीएल कार्ड रद्द करून गरजूंना त्वरित कार्ड वाटप करावे अशा विविध मागण्यात करण्यात आल्या.या मोर्चात संघटनेच्या राज्य महिला प्रमुख रोहिणीताई खंडारे, दयाराम इंगोले, वसंत मोरे, ज्ञानेश्‍वर तायडे, कैलास पंडित, नेमीचंद चव्हाण, वैशाली पवार आदी सहभागी झाले होते.