शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका-यांच्या निवासस्थानासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले फटाके!

By admin | Updated: March 18, 2016 02:04 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना : दुष्काळाच्या मुद्यावर भेट नाकारली!

वाशिम: जिल्हय़ात सर्वदूर भीषण दुष्काळसदृश स्थिती उद्भवली असताना जिल्हय़ाचा अद्याप दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश झालेला नाही. दरम्यान, या मुद्यावर गुरुवार, १७ मार्च रोजी चर्चा करण्यास गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी भेट नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानासमोर फटाके फोडून जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदविला.यासंदर्भातील निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नमूद केले आहे, की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनदरबारी पैसेवारीचा अहवाल पाठवायला उशीर करण्यात आला. यात शेतकर्‍यांचा कुठलाही दोष नसताना ते वेठीस धरल्या गेले. राज्यातील अनेक जिल्हय़ांमध्ये दुष्काळ जाहीर होऊन त्या जिल्हय़ांतील शेतकर्‍यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभदेखील मिळणे सुरू झाले आहे; मात्र वाशिम जिल्हय़ात भयावह स्थिती उद्भवली असताना तद्वतच विविध प्रकारच्या संकटांचा सामना करून हतबल झालेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबित असताना वाशिम जिल्हय़ातील एकाही गावात दुष्काळ जाहीर झालेला नाही. शासनदरबारी अहवाल पाठविण्यास उशीर झाल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे. एकूणच या सर्व विदारक स्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. याप्रसंगी संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना वेळ मागितली असता, जिल्हाधिकार्‍यांनी ती दिली नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणि जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानासमोर फटाके फोडून निषेध व्यक्त केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.