शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप !

By admin | Updated: June 24, 2017 13:13 IST

सन २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वीप्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण केले जाणार आहे.

वाशिम : सन २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वीप्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण केले जाणार आहे. १ लाख ४२ हजार ७६३ विद्यार्थ्यांना सात लाख ९१ हजार ३६७ पाठ्यपुस्तकांचा लाभ शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच दिला जाणार आहे.उन्हाळी सुटीनंतर २७ जूनला शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. शासनाच्या धोरणानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरणासाठी मागील वर्षीच्या विद्यार्थिसंख्येनुसार बालभारतीकडे पुस्तकांची मागणी करण्यात आलेली होती. बालभारतीकडून पुस्तकांचा पुरवठा केला जातो. विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, पाठ्यपुस्तकांपासून कुणीही वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून सर्व शिक्षा अभियानातून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खासगी अनुदानित शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार पुस्तकांची मागणी नोंदविली होती. त्यानुसार पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ७६३ विद्यार्थ्यांना सात लाख ९१ हजार ३६७ पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.यामध्ये कारंजा तालुक्यातील २२ हजार ६२५ विद्यार्थ्यांना एक लाख २४ हजार ६३८ पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. याप्रमाणे मालेगाव तालुक्यातील २२ हजार ८२ विद्यार्थ्यांना एक लाख २१ हजार ६९८ पाठ्यपुस्तके, मंगरूळपीर तालुक्यातील १९ हजार ५४५ विद्यार्थ्यांना एक लाख १० हजार २५६ पाठ्यपुस्तके, मानोरा तालुक्यातील १८ हजार ३८९ विद्यार्थ्यांना ९८ हजार ११६ पाठ्यपुस्तके, रिसोड तालुक्यातील २८ हजार ५२९ विद्यार्थ्यांना एक लाख ५८ हजार ४०४ पाठ्यपुस्तके तर वाशिम तालुक्यातील ३१ हजार ५९३ विद्यार्थ्यांना एक लाख ७८ हजार २५५ पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे.