वाशिम : वाशिम येथे मंजूर झालेले राज्यातील चौथे दंत महाविद्यालय आहे. आतापर्यंत केवळ मुंबई, नागपूर औरगांबाद या शहरातच शासकीय दंत महाविद्यालय होते. यानंतर आता वाशिम येथे सदर रूग्णालय सुरू होणार आहे. वाशिम येथे लवकरच शासकीय दंतरोग महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानभवनात केली. त्यामुळे लवकरच वाशिम येथे दंत महाविद्यालय सुरू होणार आहे. वाशिम जिल्ह्याची निर्मिती होवून १८ वर्षे झाली. जिल्ह्यात सिंचनाचा मोठय़ा प्रमाणात अनुशेष असून, जिल्हा आत्महत्याग्रस्त आहे. पश्चिम विदर्भात एकही दंत महाविद्यालय नाही. त्यामुळे वाशिम येथे एक दंत महाविद्यालय सुरू करण्याची मागणी आमदार राजेंद्र पाटणी यांनी केली होती. त्यामुळे बुधवारी सदर मागणी मान्य करीत वाशिम येथे लवकरच शासकीय दंत महाविद्यालय सुरू करू असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात जाहीर केले. यापूर्वी जिल्ह्यातील रूग्णांना उपचार घेण्याकरिता नागपूर, मुंबईसारख्या ठिकाणी जावून उपचार करावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळ व पैशाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत होता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा वासियांची मागणी मान्य करीत दंत महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली.
राज्यातील चौथे शासकीय दंत महाविद्यालय वाशिममध्ये
By admin | Updated: December 24, 2015 02:45 IST