शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार विद्यार्थी देणार एमपीएससीची परीक्षा

By admin | Updated: July 14, 2017 01:48 IST

१६ जुलै रोजी वाशिम शहरातील अकरा परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० ते १२ वाजेदरम्यान एकूण ४१०४ परीक्षार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी परीक्षा देणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ही संयुक्त पूर्व परीक्षा १६ जुलै रोजी वाशिम शहरातील अकरा परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० ते १२ वाजेदरम्यान एकूण ४१०४ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या अकराही परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी होणारी पूर्व परीक्षा ही वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, हॅपी फेसेस हायस्कूल, तुळशीराम जाधव महाविद्यालय, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, रेखाताई कन्या शाळा, शासकीय तंत्रनिकेतन व जवाहर नवोदय विद्यालय या अकरा परीक्षा केंद्रांवर होत आहे. या सर्व परीक्षा केंद्रानावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील इंटरनेट, झेरॉक्स सेंटर, पानपट्टी सेंटर, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परीक्षा कालावधीत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाइल, सेल्युलर फोन, लॅपटॉप, फॅक्स, वायरलेस सेट, रेडिओ व इतर प्रसारमाध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.