शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दंत महाविद्यालयासाठी चार जागांची पाहणी

By admin | Updated: March 4, 2016 02:14 IST

अहवाल वरिष्ठांच्या दरबारात.

वाशिम : वाशिम येथे नवीन शासकीय दंत महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर व औरंगाबाद येथील चमूने गुरूवारी वाशिम शहरानजीकच्या चार ठिकाणची पाहणी केली. २0१५ च्या डिसेंबर महिन्यात विधिमंडळ सभागृहात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी वाशिम येथे दंत महाविद्यालय जाहीर केले आहे. त्यानुसार दंत महाविद्यालय लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टिकोणातून महिन्याभरापूर्वी ना. मुनगुंटीवार यांनी अमरावती येथील आढावा बैठकीत दंत महाविद्यालयाबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. वाशिम येथे नवीन शासकीय दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालय सुरु करण्याबाबत शासनास अहवाल सादर करण्याकरिता समिती गठीत करण्याचे आश्‍वासन विधिमंडळ सभागृहात देण्यात आले होते. त्यानुसार आवश्यक समिती गठीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार १६ फेब्रुवारी २0१६ रोजी वाशिम येथे नवीन शासकीय दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालय सुरू करण्याकरिता भारतीय दंत परिषदेच्या निकषानुसार आवश्यक जागेची पडताळणी करणे व तद्नुषंगिक बाबींची पडताळणी करून शासनास अहवाल सादर करण्याकरिता समिती गठीत केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी, तर सदस्य म्हणून आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व एका एनजीओची प्रतिनिधी म्हणून निवड केली होती. या समितीच्या पथकाने दंत महाविद्यालयाकरिता तांत्रिकदृष्ट्या जागा व इतर बाबींची पाहणी करण्याकरिता ३ मार्च रोजी वाशिम गाठले. आमदार राजेंद्र पाटणी व चमूमधील औरंगाबाद येथील बनसोडे, इंदुरकर व नागपूर येथील गणवीर व डॉ. सातारकर या चार अधिकार्‍यांसह वाशिम तहसीलचे मंडळ अधिकारी श्याम जोशी, तलाठी नप्ते, कांबळे, इढोळे यांनी वाशिम शहरानजीकच्या चार जागेची पाहणी केली. या जागेसंबंधीची आवश्यक ती सर्व कागदपत्रे या चमूने सोबत नेली आहेत. योग्य तो अहवाल बनवून शासनाला सादर केला जाणार आहे. वाशिम येथे दंत महाविद्यालयाची कार्यवाही लवकर सुरू होण्याच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत.