पोलीस विभागाने उंबर्डा बाजार पोलीस चौकीवरील पोलिसांची संख्या वाढवून गावात गस्त सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ मंडळीमधून पुढे येत आहे . सविस्तर असे की कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या उंबर्डा बाजार येथील बसस्थानक चौकातील दैवत यांच्या हाॅटेलच्या टपरी मधील साहित्य , बिकानेर स्वीट मार्टमधील जवळपास ३० हजार रूपयांचे साहित्य तसेच इंदिरानगर झोपडपट्टीमधील मुख्य रस्त्यावरील शेषराव नेमाडे यांच्या किराणा दुकानाच्या शटर कुलूप तोडून आतमधील किराणा साहित्य तथा शब्बीर शाॅ यांच्या बकऱ्याच्या गोठ्याचे कुलूप तोडून ४० हजार रूपये किंमतीच्या चार बकऱ्या चोरट्यांनी लंपास केल्याने गावकरी मंडळीत खळबळ निर्माण झाली आहे . बातमी लिहिपर्यंत चोरीच्या घटनेची नोंद पोलिसांत झाली नव्हती. विशेष म्हणजे उंबर्डा बाजार येथे पोलीस चौकी असतांना सुद्धा दिवस व रात्र पाळीत केवळ एकाच कर्मचाऱ्याची तैनाती असल्याने चौकीवर पोलिसांची संख्या वाढवून रात्रीची गस्त सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ मंडळीमधून पुढे येत आहे.
एकाच रात्री चार ठिकाणी चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST