मानोरा : मानोरा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हट्टी आणि सोयजना येथे प्रत्येकी एका अशा एकूण दोन महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना १५ एप्रिल रोजी घडल्या. या प्रकरणी १६ एप्रिलला मानोरा पोलिसांनी पिडीतेच्या तक्रारीनुसार चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. यातील हट्टी येथील घटनेबाबत पोलिस सुत्राकडून प्राप्त माहितीनुसार हट्टी येथील २७ वर्षीय महिला ११ एप्रिलच्या रात्री १० वाजता आपल्या मुलीसह घरात झोपली असताना आरोपी संतोष पवार व लक्ष्मण पवार रा.हट्टी यांनी वाईट उद्देशाने घरात प्रवेश करुन महिलेचा विनयभंग केला व मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला. दुसऱ्या घटनेत सोमठाणा येथील विवाहीत महिला १५ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता शेतातील विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता आरोपी मनोहर राठोड व विजय राठोड रा. सोयजना यांनी फिर्यादी महिलेस आम्हाला पाणी दे असे म्हणून वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान तिचा पती येथे आला व याबाबत आरोपींना जाब विचारला असता, आरोपींनी पिडीत महिलेच्या पतीस मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन मानोरा पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ३५४, ३२३, ५०६ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास मानोरा पोलिस करीत आहेत.
मानोऱ्यात महिला विनयभंगाच्या दोन घटनांत चौघांवर गुन्हा !
By admin | Updated: April 16, 2017 21:28 IST