००००
मास्क न वापरणाऱ्या २२ जणांवर कारवाई
वाशिम : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे. वाशिम शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर न करणाऱ्या २२ जणांवर शनिवारी दंडात्मक कारवाई केली.
००००
परीक्षा शुल्काची प्रतीक्षा
कायम
वाशिम : इयत्ता बारावी व दहावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे. विद्यार्थ्यांना अद्याप शुल्क परत मिळालेले नाही. परीक्षा शुल्क परत केव्हा मिळणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
००००
धूर फवारणी करण्याची मागणी
वाशिम : पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डास प्रतिबंधक धूर फवारणी करणे गरजेचे आहे. याकडे ग्रामपंचायतींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
०००
रिठद परिसरात विजेचा लपंडाव
वाशिम : रिठद परिसरातील गावांमध्ये विद्युत पुरवठा अधूनमधून खंडित होत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळीही ही समस्या जाणवत आहे. याकडे महावितरणने लक्ष पुरवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.