शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वन व्यवस्थापन समित्या उरल्या नावापुरत्याच!

By admin | Updated: October 17, 2016 02:14 IST

वाशिम जिल्हय़ात ५८ हजार ५८९ हेक्टर क्षेत्र वनाच्छादित; ८६ पैकी ५७ समित्या पडल्या बंद .

वाशिम, दि. १६- 'वन संपत्तीची सुरक्षा करा व मिळणारा नफा वाटून घ्या', हे सूत्र अंगीकारून कधीकाळी उदयास आलेल्या जिल्हय़ातील ८६ पैकी ५७ संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आजमितीस बंद पडल्या आहेत. परिणामी, वनाच्छादित ५८ हजार ५८९ हेक्टर क्षेत्राच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वन परिक्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकास व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या मूळ उद्देशातून सन २00३ पासून महाराष्ट्र शासनाने संयुक्त वन व्यवस्थापन समित्या गठित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, वाशिम जिल्हय़ात ८६ समित्यांचे गठन करण्यात आले. त्यात वाशिम-रिसोड २२, मालेगाव १७, कारंजा-मंगरूळपीर १६ आणि मानोरा वन परिक्षेत्रात ३१ समित्या कार्यान्वित करण्यात आल्या; मात्र आजमितीस यातील केवळ २९ समित्याच कार्यान्वित असून उर्वरित ५७ समित्यांचे कामकाज पूर्णत: थांबले आहे. संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून ज्यांची उपजीविका वनांवर अवलंबून आहे, असे गावातील लोक व वन विभाग. यांच्याद्वारे सयुक्तिक वन क्षेत्रावरील नफा, जबाबदारी, सुरक्षा आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आदी कामांची विभागणी केली जाते. या समित्यांनी वनांचे संरक्षण करणे व अवैध वृक्षतोड, वन क्षेत्रातील अतिक्रमण, वन वणवा, अवैध चराई आदीस प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. स्वत:कडे वर्ग केलेल्या वनांचे व्यवस्थापन करणे, ग्रामीण जनतेमध्ये वनांच्या महत्त्वाविषयी जागृती निर्माण करणे, हे संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे आद्य कर्तव्य आहे; मात्र जिल्हय़ातील ८६ पैकी तब्बल ५७ समित्यांचे कार्य मंदावल्यामुळे मूळ उद्देशांना ठायीठायी तडे पोहचत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. संत तुकाराम वन ग्राम योजनेत जिल्हय़ाचे अपयशसंत तुकाराम महाराजांच्या नावाने राज्यभरात ह्यसंत तुकाराम वन ग्राम योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या सहभागी होतात, त्यांच्यामधून जिल्हा स्तरावरील तीन, तसेच राज्य स्तरावरील तीन उत्कृष्ट ठरणार्‍या समित्यांना संत तुकाराम वन ग्राम उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समिती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. वाशिम जिल्हय़ात मात्र या पुरस्कार योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. वाशिम वनपरिक्षेत्रात केवळ इलखी येथील वन व्यवस्थापन समितीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला.