शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

आयपीएल सट्टयावर धाड; ३.६४ लाखांचा

By admin | Updated: May 18, 2017 19:38 IST

मुद्देमाल जप्त, पाच आरोपींना अटक!

ऑनलाइन लोकमतवाशिम : गुन्हेगारीवर वचक मिळविण्याकरिता गठीत करण्यात आलेले विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून वाशिममधील सौदागरपुरा परिसरात आयपीएल क्रिकेट सट्टयावर धाड टाकली. यावेळी क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या पाच आरोपींना जेरबंद करून ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १७ मे रोजी सायंकाळी करण्यात आली.वाशिम शहरात आयपीएल क्रिकेटवर जुगार खेळविला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून विशेष पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक किरण साळवे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सौदागरपुरा परिसरात फराईमभाई इस्माईलभाई यांच्या नवीन बांधकाम असलेल्या इमारतीत धाड टाकली. यावेळी आरोपी तेथे आयपीएलमधील हैद्राबादविरूद्ध कलकत्ता नाईट राईडर्स या क्रिकेट मॅचवर मोबाईल फोनव्दारे पैशाची बेटींग लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पंचासमक्ष आरोपी कैलास संजयकुमार बसंतवाणी (वय २१ वर्षे, रा.सिंधी कॉलनी, वाशिम), अंकीत अशोक वर्मा (वय २७ वर्षे, रा.गुरुवार बाजार, वाशिम), अमीत मनोज रुपचंदाणी (वय २१ वर्षे, रा.सिंधी कॉलनी, वाशिम), राहूल जयंत पारसवाणी (वय २५ वर्षे, रा.सिंधी कॉलनी वाशिम), अजहर अहमद मकसूद अहमद (वय ४३ वर्षे, रा.पठाणपुरा, वाशिम) या पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम ४९ हजार २५० रुपयांसह ३ लाख ६४ हजार रुपयांचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींना अटक करण्यात आली.