शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदाराची कृषी सेवा केंद्रावर धाड

By admin | Updated: August 18, 2016 00:34 IST

रेशन धान्य काळ्या बाजारात नेले जात असल्याच्या संशय.

मालेगाव (जि. वाशिम), दि. १७: शहरातील रेशन धान्याची विक्री काळया बाजारात होत असल्याच्या गुप्त माहितीवरून मालेगाव तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी १७ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्समधील तिरुपती कृषी सेवा केंद्रावर धाड टाकली. या दुकानातील रेशनचा तांदूळ मेहकरला नेला. या दुकानामध्ये असलेल्या काही तांदळाचे नमूने घेवून चौकशी सुरु केली आहे. शहरातून रेशनचा तांदूळ व गहू इतर तालुक्यात व परजिल्हयात काळया बाजारातमध्ये मोठया प्रमाणात विक्री केली जाते. याबाबत गुप्त माहिती मिळाल्यावरून तहसीलदार मेटकरी यांनी तिरुपती कृषी केंद्रावर धाड टाकली. तिरुपती कृषी केंद्राचे संचालक धिरज भांगडीया यांच्या कृषी केंद्राचे परवान्याची मुदत जून २0१६ रोजी संपली. अद्यापपर्यंंंत नुतनीकरण केले नसल्याने ते बंदच असल्याचे भांगडीया यांनी सांगितले. तहसिलदार मेटकरी, नायब तहसिलदार एस.एस.दुबे, धनंजय आवटे, एन.एस.निमंकडे, केंद्रे व दत्ता यांनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, तहसिलदार मेटकरी यांनी कृषी केंद्रासंबंधी कृषी अधिकारी कव्हर यांना घटनास्थळी पाचारण केले. परवाना व नियमाबाबत अहवाल देउन योग्य कारवाई करण्याच्या सुचना केल्या. दुकानामध्ये काही औषधी आढळून आली. यासंदर्भात कृषी केंद्राचा व्यवसाय बंद करायचा होता. त्यामुळे परवान्याचे नुतनीकरण केले नाही, असे संचालक धीरज भांगडीया यांनी सांगितले. या कृषी सेवा केंद्राचा परवाना संपल्याने नियमानुसार दुकानाचे बोर्ड हटविणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्या अनुषंगाने चौकशी करण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी कव्हर यांनी सांगितले. दरम्यान, डोणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या अजनी बु. जवळ नायब तहसिलदार ए.एफ. सैय्यद यांनी मालेगावरुन जाणारा ७0 कट्टे तांदूळ १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३0 वाजताच्या दरम्यान पकडल्याचे वृत्त आहे. या तांदळाचे कनेक्शन मालेगावशी तर नाही ना? या दृष्टिकोनातून तपास होणे गरजेचे आहे.