शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी लोककलावंत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

----------- रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष वाशिम : शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत, ही ...

-----------

रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष

वाशिम : शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत, ही समस्या दूर करण्यासाठी आमदार लखन मलिक यांनी १६ जुलै रोजी शहरात आंदोलन केले. तथापि, अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नसून, या आंदोलनाच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

-----------

पावसाळ्यातही बाजार समितीत मोठी आवक

वाशिम : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले आहेत. या काळात बाजार समितीत शेतीमालाची आवक फारशी होत नाही; परंतु पीककर्जास विलंब लागत असल्याने, तसेच घरात शेतीमाल शिल्लक असल्याने शेतीकामांसाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी शेतीमालाची विक्री करीत असल्याने शेतीमालाची मोठी आवक बाजार समितीत होत आहे.

--------

तिसऱ्या लाटेची तयारी, मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था

वाशिम : राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे, तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यादृष्टीने सज्जता करण्यात येत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात मुलांसाठी १०० खाटा, तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथेही लहान मुलांसाठी २५ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला.

--------

कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर वृक्ष लागवड

वाशिम : कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कीटकशास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी सोयाबीन, तूर या पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन तसेच शेंडे खुडणे व तणनाशकाचा वापर याबाबतचा तांत्रिक संदेश शेतकऱ्यांना दिला.