शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा - खडसे

By admin | Updated: August 19, 2015 01:45 IST

मदत कार्य व पुनर्वसन, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामाचा घेतला आढावा.

वाशिम : चारा निर्मितीसाठी राज्य शासनाने हाती घातलेला गतिमान वैरण विकास कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त चारा निर्मिती करण्यावर भर देण्याच्या सूचना महसूल, कृषी व फलोत्पादन मंत्नी एकनाथ खडसे यांनी दिल्या. पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना खडसे यांनी १८ ऑगस्टला वाशिम शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक विनिता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, कृषी उपसंचालक सचिन कांबळे यांच्याकडून महसूल, कृषी व फलोत्पादन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ, मदत कार्य व पुनर्वसन, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी माजी आमदार विजय जाधव, तहसीलदार आशीष बिजवल उपस्थित होते. यावेळी खडसे म्हणाले की, राज्याच्या काही भागात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन क्षेत्नातील चारा टंचाईग्रस्त भागात पाठवण्याबाबत शासन विचार करीत आहे. त्याचबरोबर गतिमान वैरण विकास कार्यक्रमांतर्गत कमी कालावधीत तयार होणार्‍या चार्‍याची लागवड करून जिल्ह्यात जास्तीत जास्त चारा निर्मिती करण्याबाबत कृषी विभागाने प्रयत्न करावा, असे खडसे म्हणाले. जिल्हाधिकारी द्विवेदी व पोलीस अधीक्षक साहू यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. आगामी गणेशोत्सव व दुर्गा उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सतर्क राहण्याच्या व जिल्ह्यातील संवेदनशील शहरांमधील गर्दीच्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांच्याकडून जिल्ह्यात सुरु असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या कामाचा आढावा घेतला; तसेच ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत निर्देश दिलेत.