वाशिम : स्थानिक पुसद मार्गावरील रेल्वेगेटजवळ रेल्वे येण्याची वेळ झाल्यानंतर गेट बंद दरम्यान मोठया प्रमाणात वाहनांची गर्दी होवून वाहतूक विस्कळीत होत असते. येथे उडडाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. या उडाण पुलासाठी सामाजिक संघटनासह बर्याच जणांनी प्रयत्न केले.मात्र अद्यापही भिजत घोंगडे कायमच असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे येत असतांना लावलेल्या गेट खालून अनेक जण जात असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम - पुसद रस्त्यावर रेल्वेगेट असून दिवसातून या रस्त्यावरून बर्याचशा रेल्वे गाडया धावतात. जेव्हा जेव्हा रेल्वेगाडी येईल तेव्हा तेव्हा हे गेट बंद करण्यात येते. या बंद गेटमुळे प्रत्येकवेळी मोठया प्रमाणात वाहतूक प्रभावित होऊन लांबलचक रांगासुध्दा लागतात. रेल्वेगेट उघडल्याबरोबर आपल्याला आधी जायला मिळावे असे प्रत्येकाला वाटत असल्याने संपूर्ण रस्ता जाम होऊन जातो व तासनतास वाहनधारकांना ताटकळत उभे रहावे लागते. येथे उडाण पूल तयार व्हावा याकरीता शहरातील सामाजिक संघटनांसह बर्याच जणांनी प्रयत्न केले. मात्र अद्याप सदर प्रयत्नांना यश आले असल्याचे दिसून येत नाही. येथे रेल्वे येण्या-जाण्याच्या वेळेवर बंद राहणार्या गेटमुळे नागरिकांना, वाहनधारकांना तास न तास रांगेत उभे राहून आपला वेळ खर्च करावा लागत आहे.
उड्डाण पुलाचे भिजत घोंगडे कायमचं!
By admin | Updated: October 25, 2014 00:08 IST