शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेक्स व्यवसायातून लाखमोलाची उलाढाल

By admin | Updated: August 26, 2014 22:49 IST

निवडणुकीची तारीख अथवा उमेदवार्‍या अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी जिल्हाभरात बॅनरबाजीचे युद्ध रंगु लागल्याचे दिसून येत आहे.

वाशिम : विधानसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय वातावरणही तापायला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख अथवा उमेदवार्‍या अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी जिल्हाभरात बॅनरबाजीचे युद्ध रंगु लागल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघाचा व्याप पाहता सर्वच मतदारापर्यंत उमेदवारांना पोहोचवणे अशक्य आहे. त्यामुळे नेते उमेदवाराचे छायाचित्र आणि निवडणूक चिन्ह मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी होर्डींग्ज, फ्लेक्स, पोस्टरला प्राधान्य देतात, हा इतिहास आहे; मात्र यंदा काही उमेदवारांनी आतापासूनच होर्डींग्ज लावण्याचा सपाटा चालविला असल्यामुळे फ्लेक्स व्यवसायाला तेजीचे दिवस आले आहे. निवडणुकीदरम्यान या व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणार्‍या साहित्याची जुळवाजुळव इच्छुकांनी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवरील संघटना आणि पदाधिकार्‍याच्या पाठिंब्याच्या बळावर उमेदवारी मिळविण्यासाठी तडजोड सुरू आहे. यातूनच आपला जोर दिसावा यासाठी बहुरंगी फ्लेक्सवर सर्वांचाच जोर दिसून येत आहे. वाशिममध्ये फ्लेक्स प्रिंटींग व्यवसाय मोठय़ा प्रमाणात असला तरी हायस्पीड प्रिंटींगचे मशीन खूप कमी आहेत. हायस्पीड प्रिंटींग मशीनद्वारे केलेल्या मल्टीफ्लेक्सचा छपाईचा दर्जा उत्तम असल्याने अनेक इच्छुक ज्यांच्याकडे हायस्पीड प्रिंटींग मशीन आहे, त्यांनाच कामे देण्याच्या मनस्थितीत आहेत. मल्टीफ्लेक्स प्रिंटींग व्यवसायात स्पर्धा वाढली तरी छपाईच्या दरात घट झाली असल्याचे एका संचालकाने सांगितले