०००
चिखली येथे आणखी दोन रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील चिखली येथे आणखी दोन कोरोना रुग्ण शनिवारी आढळून आले. ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या.
०००
जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी
वाशिम : सन २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्यामुळे हा एकप्रकारे अन्याय असून, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासनाच्या अन्य सोयी सुविधांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली.
००००
खड्डे बुजविण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
वाशिम : मेडशी ते वाशिम या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने खड्डे असल्याने समोरून अवजड वाहन आले तर या वाहनाला बाजू द्यावी अशी असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणकडे शुक्रवारी केली.
००००
३० तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालय नाही
वाशिम : गावपातळीवरील महसूल विभागाचा कणा असलेल्या जवळपास रिसोड तालुक्यातील ३० तलाठ्यांना कार्यालयासाठी स्वतंत्र जागा व इमारत नाही. भाड्याच्या खोलीतून कामकाज करावे लागत आहे.
00
हराळ येथे तपासणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील हराळ येथे आणखी दोनजणांचा कोरोना चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील इतर नागरिकांची तपासणी केली जात आहे.