जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले आहे. मंगळवारी एका जणाला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले, तर पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली. वाशिम तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित पाच तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१७०१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१०५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
९ सक्रिय रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार नव्याने १ रुग्ण आढळून आला, तर पाच जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या गृहविलगीकरणात एकूण ९ रुग्ण आहेत. एकही रुग्ण दवाखान्यात दाखल नाही.
००००००
पाच तालुके निरंक
मंगळवारच्या अहवालानुसार वाशिम शहराचा अपवाद वगळता रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.