शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाचपैकी चार वीज उपकेंद्रांची कामे रेंगाळली!

By admin | Updated: July 2, 2016 00:06 IST

इन्फ्रा-२ ची कामे धिम्या गतीने; १0५0 पैकी कार्यान्वित झाले केवळ ४७३ रोहित्र.

वाशिम : विजेसंदर्भातील पायाभूत सुविधा योजनेंतर्गत (इन्फ्रा-२) जिल्ह्यात ५ वीज उपकेंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षाच्या काळात त्यापैकी केवळ एकच उपकेंद्र उभे करण्यात महावितरणला यश मिळाले. यासह इतरही अनेक कामे रेंगाळल्याने महावितरणप्रती जनतेतून रोष व्यक्त होत आहे. सद्या पावसाळा सुरू झाला असून खरिप हंगामातील पेरणी आणि त्यानंतर शेतांमध्ये पीके उभी होणार असल्याने किमान चार ते पाच महिने महावितरणला ह्यइन्फ्रा-२ह्णअंतर्गत सुरू असलेली कामे थांबवावी लागणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरपासून रबी हंगामाला प्रारंभ होतो. याच हंगामातील पिकांसाठी सिंचनाची प्रभावी सोय उपलब्ध व्हावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते. मात्र, विद्यूतसंदर्भातील अनेक कामे प्रलंबित असल्याने गतवर्षीप्रमाणे याहीवर्षीच्या रबी हंगामात शेतकर्‍यांच्या शेतीला पुरेशी वीज मिळणे दुरापास्त होणार आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्रा-२ अंतर्गत जिल्ह्यासाठी मंजूर १0२ कोटी रुपयाच्या निधीतून जिल्ह्यातील अडोळी, देगांव, शिरपूर (खंडाळा), डोंगरकिन्ही, कुर्‍हा अशा पाचठिकाणी विद्यूत उपकेंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, गेल्या सव्वा ते दीड वर्षाच्या काळात यापैकी केवळ अडोळी येथील विद्यूत उपकेंद्र पूर्णत्वास गेले असून इतर चारही ठिकाणची कामे धिम्या गतीने सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यात आठठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर लावण्याचे नियोजन आहे. त्यापैकी वाशिम सिव्हील लाईन, मसलापेन, मोप आणि शेलुबाजार या चारठिकाणची कामे पूर्ण झाली; तर पोहा, काकडशिवणी, कामरगांव आणि मानोरा या चारठिकाणची कामे रखडली आहेत. इन्फ्रा-२ च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी १0५0 रोहित्र लागणार होती. त्यापैकी आजमितीस उणेपूरे ४७३ रोहित्रांची कामे आटोपली असून इतर ५७७ रोहित्रांची कामे व्हायची बाकी आहेत. एकूणच या सर्व बाबींचा विजपुरवठय़ावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, ही गंभीर बाब लक्षात घेवून वीज वितरण विभागाने रखडलेली कामे विनाविलंब पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.