शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियान ई-लर्निंग कोर्समध्ये वाशिमचे करनिरीक्षक विभागात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:49 IST

वाशिम: वाशिम नगर परिषदेचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार यांनी  अमरावती विभागामधून सर्वात जास्त ई लर्निंग कोर्स पूर्ण करून वाशिम नगर परिषदेचे नाव स्वच्छ भारत पोर्टलवर अधोरेखित केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात दहाव्या क्रमांकावर १२५ कोर्स केले पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वाशिम नगर परिषदेचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार यांनी  अमरावती विभागामधून सर्वात जास्त ई लर्निंग कोर्स पूर्ण करून वाशिम नगर परिषदेचे नाव स्वच्छ भारत पोर्टलवर अधोरेखित केले आहे. त्यांनी १२५ कोर्स पूर्ण केले आहेत. अ. अजीज अ. सत्तार यांचा ई लर्निंग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणार्‍यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र स्तरावर १0 क्रमांक लागत असून, अमरावती विभागातून ते प्रथम आहेत.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला. अभियानाचा पुढचा टप्पा स्वच्छ सर्वेक्षण २0१८ साठी वाशिम नगर परिषदेने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न सुरु केलेत. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानाचे अधिकृत पोर्टल ‘स्वच्छभारत.क्लाऊडअप.नेट’ या पोर्टलवर स्वच्छताविषयी विविध शहरांनी केलेल्या प्रयत्नांचे रोल मॉडेल कोर्स उपलब्ध आहेत.  या पोर्टलवरील कोर्स पूर्ण करण्याकरिता शासनाच्या निर्देशानुसार सर्व नगर परिषद कर्मचार्‍यांना अनिवार्य केले आहे. त्याकरिता मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी नगर परिषद वाशिमच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन संगणक अभियंता राहुल कंकाळ यांना नगर परिषद कर्मचार्‍यांना सदर प्रणालीचे प्रशिक्षण देण्याबाबत आदेशित केले होते. नगर परिषद कर्मचारी व नगर परिषद अधिनस्थ शाळांचे शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले. आतापर्यंत वाशिम नगर परिषदेच्या विविध विभागातील एकूण ३0  कर्मचार्‍यांनी ई लर्निंग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. वाशिम नगर परिषदेचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार यांचा अमरावती विभागामधून  प्रथम; तर महाराष्ट्र स्तरावर दहावा क्रमांक लागतो. तसेच अ. अजिज यांनी  कर वसुली विभागातील  संतोष किरळकर, साहेबराव उगले, शिवाजी इंगळे, मुन्ना खान व इतर सर्व कर्मचार्‍यांकडूनही यशस्वीरीत्या ई लर्निंग कोर्स पूर्ण करून घेतला. त्यांच्या या कार्याचे वाशिम शहरात सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान