शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

२७ जूनला सर्व शाळांची पहिली घंटा !

By admin | Updated: June 19, 2017 13:44 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच खासगी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा एकाच दिवशी अर्थात २७ जूनपासून सुरू कराव्या, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिल्या.

वाशिम : पालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच खासगी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा एकाच दिवशी अर्थात २७ जूनपासून सुरू कराव्या, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिल्या.उच्च न्यायालयाचा ८ जून २००७ चा निर्णय तसेच २२ जून २००७ च्या शासन आदेशात स्पष्ट आहे की विदर्भातील सर्व शाळा या एकच दिवशी २६ जून ला उघडण्यात याव्या. यावर्षी २६ जून रोजी ह्यरमजानह्णची सुट्टी असल्याने २७ जूनपासून स्थानिक स्वराज्य संस्थेसह सर्व खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होणे अपेक्षीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळा २७ जूनला सुरू होतात. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळा २७ जूनपूर्वीच सुरू होतात, हा दरवर्षीचा अनुभव आहे. यासंदर्भात मालेगाव तालुक्यातील शिक्षक व मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवून सर्व शाळा २७ जूनपासून सुरू कराव्या, अशी मागणी केली होती. इंग्रजी मध्यमाच्या शाळा या जून महिन्यातील कोणत्याही तारखेपासून भरविण्यात येत आहेत. वेगवेगळ्या तारखेला शाळा सुरू होत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळा लवकर सुरू होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या रोषाला शिक्षक व मुख्याध्यापकांना बळी पडावे लागते.  म्हणून इंग्रजी माध्यमाच्या संस्थांनीदेखील २७ जूनपासून शाळा सुरू कराव्या, अशा सूचना मानकर यांनी दिल्या. २७ जूनपूर्वी कुणी शाळा सुरू करीत असेल तर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारादेखील मानकर यांनी दिला.