हराळ (वाशिम), दि. २६- येथील शेतकरी प्रकाश सरकटे यांच्या शेतातील गोठय़ाला २६ मार्च रोजी अचानक आग लागून शेतीपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले. यासह दोन बैल गंभीर जखमी झाले असून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार प्रकाश सरकटे यांच्या शेतातून गेलेल्या वीज वाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. या वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गुरांच्या गोठय़ाला आग लागली. दरम्यान, घटनेची वार्ता कळताच गावातील लोकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र तोपर्यंंत मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते.
हराळ येथे आग
By admin | Updated: March 27, 2017 02:20 IST