भंडारा येथील सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही निष्पाप नवजात बालकांचा करुण अंत झाला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये आगीपासून बचावासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जातात, याविषयी जाणून घेतले असता परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५३ उपकेंद्रांमध्ये आरोग्य विभागाने केवळ ‘फायर एक्सटींग्युशर’ दिलेले आहेत मात्र त्याची रिफीलिंग गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे ते कालबाह्य झाले असून आगीची घटना घडल्यास या यंत्रांचा कुठलाही उपयोग होणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
.................
कोट :
जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना अग्निअवरोधक यंत्र पुरविण्यात आले आहेत, मात्र त्याची रिफिलिंग झालेली नाही. याबाबत तत्काळ नियोजन करून प्रश्न निकाली काढला जाईल.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम