शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

.. अखेर २३ पोलिस कर्मचारी रुजू

By admin | Updated: August 25, 2014 01:54 IST

‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल.

वाशिम : अमानी महामार्ग पोलिस मदत केंद्रावर रुजू होण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने १८ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित करताच, पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांनी २२ ऑगस्ट रोजी सदर पोलिस कर्मचार्‍यांना कार्यमुक्त केल्याने या कर्मचार्‍यांचा अमानी केंद्रावर रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महामार्गावरील बेताल वाहतुकीला ताळय़ावर आणण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिस मदत केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्हय़ात अमानी येथे महामार्ग पोलिस मदत केंद्र आहे. या केंद्रावर एक पोलिस उपनिरीक्षक, ३४ कर्मचारी व दोन चालक असा फौजफाटा देण्यात आला आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षासाठी निश्‍चित करण्यात आलेला आहे. डिसेंबर २0१२ मध्ये ३२ कर्मचार्‍यांचा तीन वर्षांंंचा सेवाकाळ संपुष्टात आल्याने मुंबई येथे डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात महामार्गाचे तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कांबळे यांच्या पॅनलने मुलाखत प्रक्रिया राबविली. मुलाखतीमधून अमानी येथे ३२ जणांची निवड करण्यात आली होती. नियुक्तीच्या पाच महिन्यानंतर नऊ कर्मचारी रुजू झाले होते. एक पोलिस उपनिरीक्षक, नऊ कर्मचारी आणि दोन चालक अशा १२ जणांच्या भरोशावर महामार्गावर ह्यवॉचह्ण ठेवण्याचे अवघड शिवधनुष्य या कर्मचार्‍यांना पेलावे लागत होते. कर्मचारी नसल्याने पातूर महामार्ग चौकीला कुलूप लागले आहे, तर अमानी केंद्र कसेबसे सुरू होते. कर्मचारी रुजू का होत नाहीत किंवा त्यांना पूर्वीच्या ठिकाणावरून कार्यमुक्त केले जात नाही, याबाबतचे गुलदस्त्यात असलेले ह्यवास्तवह्ण लोकमतने १८ ऑगस्ट रोजी वृत्ताद्वारे चव्हाट्यावर आणले होते. या वृत्ताची दखल घेत प्रभारी पोलिस अधीक्षक पाटील यांनी २३ कर्मचार्‍यांना वाशिम पोलिस दलातील सध्याच्या पोस्टिंगवरून कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे अमानी पोलिस मदत केंद्रावर कर्मचारी रुजू होत आहेत.