शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’चे भूसंपादन अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:47 IST

नागपूर ते मुंबई सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. १,०९३ हेक्टर संपादित करण्यात आली असून

- सुनील काकडेवाशिम -  नागपूर ते मुंबई सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. १,०९३ हेक्टर संपादित करण्यात आली असून, त्यापोटी संबंधित १ हजार ९९७ शेतकऱ्यांना ३८४.५२ कोटी रुपयांचा मोबदलादेखील वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक सुनील माळी यांनी सोमवारी दिली.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्याातील कारंजा लाड, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांतील ५४ गावांमधून एकंदरीत १ हजार ४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात वनविभागाच्या मालकीची १३४ हेक्टर आणि शासकीय मालकीची ७० हेक्टर जमीन असून उर्वरित जमीन शेतकºयांच्या मालकीची आहे. दरम्यान, सुपीक जमिनी देण्यास मध्यंतरी काही शेतकºयांमधून प्रखर विरोध दर्शविण्यात आल्याने भूसंपादनाची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. यादरम्यान रेडी रेकनर दराच्या पाचपट मोबदला देण्याची तयारी शासनाने दर्शवून शेतकºयांना समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्याचे आवाहन केले. त्यानुसार, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ जुलै २०१७ रोजी कारंजा येथून ‘अल्फाबेटीकल’ पद्धतीनुसार शेतकºयांकडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत (११ जून पर्यंत) अपेक्षित १,४०९ हेक्टरपैकी शेतकºयांची ८६४ हेक्टर व शासकीय २२९ हेक्टर अशी एकूण १,०९३ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.   

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnewsबातम्या