शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: June 17, 2014 23:49 IST

अनधिकृत बांधकाम प्रकरणी नगर परिषदेचे अधिकार्‍यांनी दोघांविरूघ्द गुन्हा दाखल करण्यात आला.

वाशिम : येथील शहर पोलिस स्टेशनच्या मागे असलेल्या ईश्‍वरी कॉलनी जवळ शहरातील बिल्डर व्यावसायीकांनी अनधिकृत बांधकाम केले. याप्रकरणी नगर परिषदेचे आरेखक तथा पदनिर्देशीत अधिकार्‍यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरूघ्द नगर रचना अधिनियम १९८३ च्या कलम ५४ सह (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

वाशिम शहरातील अनिल ब्रिजलाल नेनवाणी व शंकर अशोककुमार केसवाणी या दोघांनी शेत सर्वे क्रमांक ३४८ मधील भुखंड क्रमांक १७ व १८ यावर फ्लॅटचे बांधकाम केले. सदर बांधकाम करणेसाठी नगर परिषदेने १५ अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या अटी व शर्तीच्या कायद्याचा भंग केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. नेनवाणी व केसवाणी यांनी ज्या ठिकाणी बांधकाम केले त्या ठिकाणापासुन मोठा नाला जातो. या नाल्यामध्ये ढब्बरचा भराव टाकुन नाल्यावर बांधकाम केले. भुखंडावर नगर परिषदेने ७१२.६४ चौ.मी. बांधकामाची परवानगी दिली आहे. परंतू परवानगी व्यतिरिक्त अनाधिकृत बांधकाम १२७४.४0 चौ.मी. बांधकाम केल्याचे नगर परिषदेच्या अधिकार्‍यांना आढळून आले. बांधकाम केलेल्या जागेमध्ये यमसय अंतर मध्ये खुल्या जागेत ५६१.६0 चौ.मी. बांधकाम अनाधिकृत करण्यात आले आहे. सदर बांधकाम हे १ जुन २0१२ रोजी दिलेल्या बांधकाम परवानगी नुसार नसल्याच आढळून आले. त्यामुळे सदर जमीनीवरील विकसीत केलेले बांधकाम हे कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. उपरोक्त दोन्ही बिल्डरला ३१ मे २0१४ रोजी अधिनियमाचे कलम ५४ प्रमाणे नोटीस देऊन बांधकाम थांबविण्याची सुचना दिली होती. या सुचनेमध्ये स्पष्ट नमुद होते की, सुचना मिळाल्यापासुन एक महिण्याचे आत भुखंड क्र. १७ व १८ या जागेवरील बांधकाम पाडुन टाकावे व सदरच्या जागेचा अनाधिकृत वापर करण्याचे बंद कराव. सदर विकासाचे काम केले जाण्यापुर्वी जमीन ज्या स्थितीत होती त्या स्थितीत आणावी. या सुचनेचे पालन न केल्यास आपणाविरूध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. याशिवाय अनाधिकृत बांधकाम पाडण्यात येईल. अशी सुचना देण्यात आली होती. उपरोक्त सुचनेचे पालन न केल्यामुळे व सदरहू जागेवर विकसीत अनाधिकृत बांधकाम केल्याने नगर परिषदेचे आरेखक तथा पदनिर्देशीत अधिकारी सय्यद अख्तर अली सय्यद गफुर यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदविली. या फिर्यादीवरून पोलिसांनी केसवाणी व नेनवाणी यांच्याविरूध्द नगर रचना अधिनियम १९८३ च्या कलम ५४ सह (२) नुसार गुन्हा दाखल केला. यामुळे अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.