धनंजय कपाले / वाशिमवाशिम : जिल्हा परिषदेच्या पदभरतीतील ह्यफार्मासिस्टह्ण ची परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ह्यसिग्मा ओएमआरह्ण एजन्सीच्या एजंटने जिल्हा परिषद प्रशासनावर आणली. या अनुषंगाने ह्यसिग्माह्ण ला अभय कशासाठी? या मथळ्याखाली ह्यलोकमतनेह्ण २५ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची जिल्हाधिकार्यांनी दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना गुन्हे दाखल करण्याचे निर्देष दिल्याची माहिती १ डिसेंबर रोजी दिली. जिल्हा परिषद पदभरतीमधील घोटाळा ह्यलोकमतह्ण ने सर्वप्रथम २१ नोव्हेंबर रोजी चव्हाट्यावर आणला. त्यानंतर सातत्याने हे प्रकरण लावुन धरले. त्याचाच परिणाम म्हणून जिल्हाधिकारी कुलकर्णी यांना ८ नोव्हेंबर रोजी पार पडलेला ह्यफार्मासिस्टचाह्ण पेपर रद्द करावा लागला. लोकमतने एवढय़ावरच आपला लढा न थांबविता ह्यसिग्माह्ण ओएमआर एजन्सीच्या एजंटने केलेल्या उत्तर पत्रिकेमधील अफरातफरही शोधुन काढली. या सर्व घटनाक्रमाची लोकमतने अक्षरश: चिरफाड केली. दरम्यान ह्यलोकमतनेह्ण २१ नोव्हेंबर रोजी ह्यओएमआर एजन्सी बदलामागे गौडबंगालह्ण या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाची झोप उडविली. पदभरतीमधील परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणीचे कंत्राट प्रथम ह्यसिग्माह्ण या एजन्सीला देण्यात आले होते. सिग्मा एजन्सी ऐनवेळेवर बदलण्याचे मुख्य कारण ह्यबनावट उत्तरपत्रिकाह्ण असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या एजन्सीच्या एजंटने एका उमेदवाराची उत्तरपत्रिकाच बनावट तयार केल्याचे निवड समितीच्या निदर्शनास आले होते. उत्तरपत्रिकेवर पर्यवेक्षक व विद्यार्थ्याची ह्यस्कॅनह्ण केलेली स्वाक्षरी असल्याचे समोर आले आहे. सिग्मा एजन्सीच्या एजंटने अशाप्रकारचा गुन्हा केल्याचेही लोकमतने १९ नोव्हेंबर रोजीच प्रसिध्द केले होते. मात्र, एजंटने अशाप्रकारचा गोंधळ केल्याचा दुजोरा प्रशासनाच्या वतीने मिळू शकला नव्हता. सर्व अधिकार्यांनी त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर देण्यास असर्मथतता दर्शविली होती. अखेर जिल्हाधिकार्यांनीच सिग्माच्या एजंटने उत्तरपत्रिकेत अफरातफर केल्याच्या कृत्याला दुजोरा दिल्याने लोकमतच्या लढय़ाला यश आले.
‘सिग्मा’ एजन्सीवर गुन्हे दाखल करा
By admin | Updated: December 3, 2014 01:34 IST