शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्यासाठी लढा!

By admin | Updated: August 9, 2014 22:05 IST

मेडशी, मुगळा, गोकसावंगी व रिधोरा येथील शेतकरी

वाशीम : जिल्ह्यातील मालेगाव तालूक्यांतर्गत येत असलेल्या उध्र्व मोर्णा प्रकल्पांतर्गत जमीन संपादीत केल्या गेलेल्या मेडशी, मुंगळा, गोकसावंगी व रिधोरा या चार गावातील जवळपास ७४ शेतकर्‍यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार जमीनीचा मोबदला मिळण्यासाटी लढा उभारला आहे. १९९६ मध्ये मालेगाव तालूक्यातील मेडशीलगतच्या मोर्णा नदीवरील उध्र्व मोर्णा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. मालेगाव तालूक्यातील सिंचनक्षेत्र वाढीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पासाठी मेडशी, मुंगळा, गोकसावंगी, रिधोरासह मोर्णा नदीपात्राच्या लगतच्या क्षेत्रातील शेतकर्‍यांची शेकडो एकर जमीन संपादीत केली गेली. छोट्या मोठय़ा जवळपास ८0 शेतकर्‍यांच्या शेतजमीनी या प्रकल्पासाठी मातीमोल भावाने संपादीत केल्या गेल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. त्यावेळी शेतकर्‍यांना एकरी १३ हजार रुपये प्रमाणे शेतकर्‍यांना मोबदला देवू केला. तो मोबदलाही आपल्या संपादीत क्षेत्रानुसार तीन टप्प्यात देण्याचा घाट संबंधीतांनी घातला. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांना आपल्या संपादीत जमीनीचा त्यावेळच्या भावाप्रमाणे शासनाने दिला तो मिळण्यासाठी किमान चार ते पाच वर्ष शेतकर्‍यांना वाट पहावी लागली. सहाजीकच प्रकल्पनिर्मीतीपर्यंत हा जमीन मोबदला मिळण्याचा प्रपंच चालल्याने जमीनीच्या वाढत्या दराप्रमाणे शासन प्रशासनाने जमीनीचा मोबदला द्यावा म्हणून शासनदरबारी रेटा लावला. त्यावर निर्णय न घेतल्या गेल्याने प्रकल्पासाठी जमीनीचा संपादीत केलेल्या जवळपास १0 शेतकर्‍यांनी जमीनीचा मोबदला मागणीनुसार मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. वाशिमच्या जिल्हा सत्र न्यायालयाने याप्रकरणी निर्णय देत १ लाख ४0 हजार रुपये प्रतीएकर प्रमाणे मोबदला देण्याचे आदेशीत केले. परंतू न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गत तिन वर्षात कांड्यावर मोजण्याइतक्याच शेतकर्‍यांना संपादीत जमीनीचा मोबदला देण्यात आल्याची माहिती प्रकल्पबाधीत शेतकरीपूत्र बंडू बळीराम तायडे यांनी दिली. बाधींतापैकी काही शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे त्यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संपादीत जमीनीचा मोबदला देण्याचे काम झाले. तोच नियम आम्हाला लागू नाही का म्हणत मेडशी, मुंगळा, गोकसावंगी व रिधोरा येथील जवळपास ७४ शेतकर्‍यांनी जमीनीच्या मोबदला कलम २८ अ नुसार न्यायालयाच्या आदेशीत दराप्रमाणे देण्याच्या मागणीसाठी ७ ऑगस्टरोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. याप्रकरणी १४ ऑगस्टपूर्वी निर्णय घेवून न्याय न दिल्यास उध्र्व मोर्णा प्रकल्पाच्या भिंतीवर १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.