वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी २५ सप्टेंबरला नामांकन दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील कारंजा मतदार संघात ५ उमेदवारांनी ८ नामांकन दाखल केले. वाशिम विधानसभा मतदार संघ निवडणूकीसाठी २ तर रिसोड मतदार संधात एकूण ३ जणांनी नामांकन दाखल केले.आज २५ सप्टेंबर रोजी वाशिम विधानसभा मतदार संघातून भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतिने संजय जानराव मांडवधरे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतिने आत्माराम संपतराव अडागळे यांनी अर्ज दाखल केला. तसेच कारंजा विधानसभा मतदार संघामध्ये ५ उमेदवारांनी आज एकूण ८ अर्ज दाखल केले. यामध्ये भारिप बमसंच्यावतिने युसूफ पुंजानी यांनी ३ अर्ज दाखल केले तर राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतिने बाबुसिंग नाईक यांनी २ उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच काँग्रेसच्यावतिने ज्योती गणेशपुरे, शिवसेनेच्यावतिने सदाशिव लोडम तर अपक्ष म्हणून दिलीप मोहीते यांनी अर्ज दाखल केले. रिसोड विधानसभा मतदार संघातून ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये संतोष बाबर, मो. एजाज कुरेशी व सचिन नवघरे यांचा समावेश आहे. वाशिम विधानसभा मतदार संघात २५ सप्टेंबर रोजी २८ लोकांनी ५३ अर्ज नेलेत. अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून आजपर्यंत वाशिम विधानसभा मतदार संघामध्ये ८१ लोकांनी १५६ अर्ज नेलेत. कारंजा विधानसभा मतदार संघात २५ सप्टेंबर रोजी १0 लोकांनी १९ अर्ज नेले तर आजपर्यंत ८३ लोकांनी १८९ अर्ज नेले. रिसोड विधानसभा मतदार संघात एकूण ९२ अर्जाची विक्री झाली.
पाचव्या दिवशी तिन्ही मतदारसंघात १३ नामांकन दाखल
By admin | Updated: September 26, 2014 00:38 IST